आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असहिष्णुता हा राजकीय मुद्दा, असहिष्णुता नाहीच : सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशात असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून सुरू असलेला वाद हा ‘राजकीय मुद्दा’ असल्याचे सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर यांनी म्हटले आहे. देशात असहिष्णुता नसल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. जोवर न्यायपालिका स्वतंत्र आहे तोवर कोणत्याही गोष्टीची भीती नसावी. सर्वाच्च न्यायालय प्रत्येक धर्म, पंथ, जातीच्या लोकांच्या हक्कांचे संरक्षण करेल, असेही त्यांनी सांगितले.

तीन डिसेंबरला देशाच्या सरन्यायाधीशपदाची धुरा स्वीकारल्यानंतर न्या. ठाकूर यांनी प्रथमच पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा केली. असहिष्णुतेच्या प्रश्नावर ते म्हणाले, मी सर्वांना आवाहन करतो की, एकमेकांबद्दल सद‌््भाव ठेवावा. समाजात वैराची भावना घटवून एकोप्याने राहावे. देशात कायद्याचे राज्य कायम राखणाऱ्या संस्थेचे नेतृत्व मी करत आहे. जोवर न्यायपालिका स्वायत्त आहे तोवर घाबरण्याची गरज नाही. सरन्यायाधीशांच्या मतांचे भाजपने स्वागत केले आहे. पक्ष प्रवक्ते सिद्धार्थ नाथ सिंह म्हणाले, असहिष्णुतेवर सरन्यायाधीशांनी मांडलेले मुद्दे सत्य आहेत. लोकशाहीचे चारही स्तंभ स्वतंत्र आहेत. ते एकत्रितरीत्या काम करत आहेत. असे असताना देशात असहिष्णुता कशी काय असू शकते?, असा प्रश्‍नही त्‍यांनी विचारला.
बातम्या आणखी आहेत...