आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • President Pranab Mukherjee Speaking On National Press Day

#Intolerance प्रणव मुखर्जी म्‍हणाले, पुरस्‍कारांची किंमत ओळखून आदर करा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशभरात सध्‍या असहिष्णूतेच्‍या मुद्द्यावर वादविवाद होत आहे. यावर राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी यांनीही मत मांडले आहे. पुरस्‍कार परत करणा-यांना उद्देशून सोमवारी ते म्‍हणाले की, पुरस्‍कार प्राप्‍त करणा-यांनी त्‍याचे महत्‍त्व लक्षात घ्‍यावे व पुरस्‍कारांचा आदर करायला हवा. देशातील असहिष्णूतेचे कारण सांगत लेखक आणि चित्रपट निर्मात्‍यांनी आपल्‍याला मिळालेले पुरस्‍कार परत केले, त्‍यांना राष्‍ट्रपती मुखर्जी यांनी सल्‍ला दिला आहे.
आणखी काय म्‍हणाले राष्‍ट्रपती ?
>राष्‍ट्रीय पत्रकारिता दिनानिमित्‍त राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्‍ट्रीय पुरस्‍कार प्राप्‍त करणारे पत्रकार आणि छायाचित्रकारांना शुभेच्‍छा दिल्‍या.
> एएनआय या वृत्‍तसंस्‍थेच्‍या माहितीनुसार, राष्‍ट्रपती म्‍हणाले, '' प्रचंड मेहनत, ज्ञान आणि गुणवत्‍तेच्‍या आधारे लेखकांना पुरस्‍कार दिले जातात. त्‍या पुरस्‍कारांनी किंमत लक्षात घेऊन त्‍यांचा आदर करायला हवा.’’
>ते म्‍हणाले, "संवेदनशील लोक कधी-कधी समाजातील काही घटनांमुळे अस्वस्थ होतात. मात्र या घटनांनंतर चिंता व्‍यक्‍त करण्‍याचे माध्‍यम संतुलित असायला हवे."
> राष्‍ट्रपती असेही म्‍हणाले, "आपला भारतीय संविधानात असलेल्‍या मूल्य आणि तत्त्वांवर विश्‍वास असावा."
>"जेव्‍हा जेव्‍हा गरज भासली, तेव्‍हा भारत सुधारणा करण्‍यात यशस्‍वी ठरला आहे."
>राष्‍ट्रपतींनी कार्टूनिस्ट आर.के. लक्ष्मण आणि राजिंदर पुरी यांना श्रद्धांजलि वाहिली.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, असहिष्णूतेच्‍या मुद्द्यावर कोणी काय म्‍हटले..