आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Investigation Of American School Scam By Income Tax Department

आयकर खात्याकडून अमेरिकी शाळेतील गैरव्यवहाराची चौकशी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आयकर विभागाने अमेरिकी वकीलातीमधील शाळेच्या कर चुकवेगिरीची चौकशी सुरु केली आहे.मात्र शाळेतील शिक्षक आणि त्यांच्या वेतनाबद्दल अमेरिकी अधिकार्‍यांकडून पररराष्ट्र मंत्रालयास अद्याप माहिती मिळालेली नाही.

आयकर विभागाची एक्झमशन विंग धर्मादाय संस्थांच्या कराशी संबंधित प्रकरणाची देखरेख करत असते.याच खात्यातर्फे अमेरिकी शाळेच्या कथित कर चुकवेगिरी आणि इतर आर्थिक बाबींची चौकशी सुरु केली आहे. प्राथमिक चौकशीनंतर संबंधित अधिकार्‍यांना नोटीस जारी केली जाऊ शकते. हे प्रकरण संवेदनशील व दोन देशांतील संबंधाशी निगडीत असल्याने केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळालाही याबद्दल माहिती दिली जाईल.अमेरिकी वकीलातीलमधील शाळेत काही शिक्षक अवैधरित्या काम करीत आहेत.