आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल कायदाच्या संशयित दहशतवाद्याची चौकशी; दहशतवादी बनण्यासाठी करायचा ब्रेनवॉशिंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- अल कायदाचा संशयित दहशतवादी झिशान अलीला १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सौदी अरबने त्याच्यावर हद्दपारीची कारवाई करत त्याला भारतात पाठवले. बुधवारी सायंकाळी तो भारतात आल्याचे सूत्रांनी सांगितले. भारतीय तरुणांना अल कायदामध्ये दाखल होण्यासाठी तो प्रोत्साहित करत होता. त्यांचे ब्रेनवॉशिंग करत होता, असे त्याच्यावर आरोप आहेत. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सिद्धार्थ सिंह यांनी त्याला १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दिल्ली पोलिस आता त्याची चौकशी करतील. दहशतवादासाठी भारतीय तरुणांना चिथावण्याप्रकरणी यापू्र्वी सय्यद अंझार शहा, महंमद आसिफ, झाफर मसूद, महंमद अब्दुल रेहमान, अब्दुल सामी यांना अटक करण्यात आली होती. 
   
त्याच्या चौकशीसाठी २० दिवसांचा अवधी पोलिस विभागाने मागितला होता. दरम्यान, झिशान अलीचे वकील एम. एस. खान यांनी यावर आक्षेप घेतला. दिल्ली पोलिसांच्या विशेष विभागाद्वारे अलीला ताब्यात घेण्यात आले आहे. वर्षभरापासून पोलिस त्याच्या शोधात होते. 
बातम्या आणखी आहेत...