आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Involvement Of Third Person In Delhi Child Rape Case

दिल्‍ली बलात्‍कारः कोणत्‍याही परिस्थितीत प्रदीपला करायची होती वासना शांत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- दिल्‍लीत 5 वर्षी चिमुकलीच्‍या बलात्‍कार प्रकरणात नवे वळण आले आहे. याप्रकरणात तिसरा व्‍यक्तीदेखील सहभागी असल्‍याची माहिती आरोपींनी दिली आहे. त्‍यामुळे पो‍लीस यंत्रणा बुचकाळ्यात पडली आहे. आता या तिस-या व्‍यक्तीचा शोध घेण्‍यात येत असून पोलिसांनी याप्रकरणात सामुहिक बलात्‍काराचा गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे.

चिमुकलीवर बलात्‍काराच्‍या प्रकरणात पोलिसांनी प्रदीप नावाच्‍या दुस-या आरोपीला अटक केली होती. त्‍याची कसून चौकशी करण्‍यात आली. सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, त्‍याने तिस-या व्‍यक्तीचा सहभाग असल्‍याचे सांगितले. त्‍यामुळे पोलीस संभ्रमात पडले. तो सतत जबाब बदलत आहे. त्‍यामुळे इन कॅमेरा त्‍याचा जबाब नोंदविण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला आहे. प्रदीपने गुन्‍हा कबूल केला असून खूप मोठी चूक केल्‍याचे त्‍याने पोलिसांना सांगितले.