आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IOA Secretary General, Wrestling Referee Arrested In Glasgow, Divya Marathi

भारतीय अधिकारी, कुस्ती पंच अटकेत; लैंगिक शोषणाचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - राजीव मेहता)
ग्लासगो - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेदरम्यान दोन अधिकार्‍यांना अटक झाल्याने भारतीय पथकाची मान खाली गेली आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (आयओए) सरचिटणीस राजीव मेहता यांना दारू पिऊन गाडी चालवल्याच्या, तर कुस्ती पंच वीरेंद्र मलिक यांना लैंगिक शोषणाच्या आरोपावरून शनिवारी अटक झाली आहे. त्यांना सोमवारी न्यायालयासमोर उभे केले जाईल. स्कॉटलंड यार्डच्या प्रवक्त्याने अटकेला दुजोरा दिला. मात्र, त्यांनी आरोपांबाबत काहीही सांगितले नाही.

आज ग्लासगो न्यायालयात दोघांनाही हजर करणार
- मेहता आणि मलिक हे दोघेही भारताच्या अधिकृत 215 सदस्यीय दलाचा भाग नाहीत. त्यामुळे ते क्रीडाग्रामऐवजी हॉटेलमध्ये थांबले होते.
- स्कॉटलंडमध्ये दारू पिऊन गाडी चालवल्यास सहा महिन्यांची कैद आणि 5000 पौंड दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. ड्रायव्हिंगवर 12 महिन्यांची बंदीही शक्य.

- पोलिसांनी दोन भारतीय अधिकार्‍यांना ताब्यात घेतल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. आम्ही आमच्या एका अधिकार्‍याला या प्रकरणावर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. - प्रवक्ता, भारतीय वाणिज्य दूतावास, एडिनबर्ग

- आम्हाला अटकेबाबत माहिती आहे. पण हे प्रकरण स्कॉटलंड पोलिसांशी संबंधित आहे. जर आमच्याशी संपर्क साधण्यात आला किंवा कुठली माहिती मागवली गेली तर संपूर्ण सहकार्य केले जाईल.- माइक कूपर, सीईओ, राष्ट्रकुल क्रीडा संघटना