आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विना सब्सिडी गॅस सिलेंडर 92 रुपयांनी स्वस्त, जेट इंधनच्या किमतीत वाढ; आयओसीची घोषणा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सरकारी तेल कंपनी इंडियन ऑईलने विना सवलतीच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 92 रुपयांनी कमी करत असल्याची घोषणा केली. मुंबईत विना सब्सिडीचे सिलेंडर आता 631 रुपयांत मिळणार आहे. तर दुसरीकडे, जेट इंधनाच्या किमतीत प्रति किलोलीटर प्रमाणे 214 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सुधारित आणि नवीन किंमत 1 मे 2017 पासून लागू झाली आहे.
 
आयओसीने आपल्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीप्रमाणे, प्रत्येक राज्यात एलपीजी सिलेंडरची किंमत वेग-वेगळी असू शकते. इतर दोन कंपन्या हिन्दुस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम सुद्धा आपल्या किमती निश्चित करताना आयओसीचे अनुकरण करतात. 
 
4 शहरांमध्ये प्रति 14.2 किलो सिलेंडरच्या किमती
शहर
नवीन किमती (रुपयांत)
जुन्या किमती (रुपयांत)
मुंबई
635
729.50
दिल्‍ली
631
723
कोलकाता
650
742
चेन्‍नई
638.50
731.50
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...