आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Iphone 6 Users Complaining Of Smartphone Body Bend Under Pressure

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खिशात वाकत आहे iPhone 6, अनेक युजर्सने केली तक्रार; पाहा VIDEO

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - तंत्रज्ञानातील दिग्गज कंपनी अ‍ॅपलने नुकतेच लॉन्च केलेले आयफोन 6 आणि आयफोन 6प्लस स्मार्टफोनमध्ये एक अजब तांत्रिक चूक असल्याचे समोर आले आहे. अनेक युजर्सनी तक्रार केली आहे, की हे फोन खिशात ठेवल्यानंतर त्यावर थोडाजरी दबाव पडला तर, अ‍ॅल्यूमिनीयम बॉडी असलेले हे फोन वाकडे होत आहेत. लॉन्च झाल्यानंतर आयफोन 6आणि आयफोन 6प्लस अमेरिकेमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत. भारतीय बाजारात ते 17 ऑक्टोबरला दाखल होणार आहेत. जगभरामध्ये या फोनबद्दलची क्रेझ आहे. अ‍ॅपलने आतापर्यंत या फोनच्या एक कोटी युनिटची व्रिकी केली आहे.
टेक्नॉलॉजी वेबसाइट सीनेटच्या वृत्तानुसार, वाकडे झालेल्या आयफोन 6स्मार्टफोनची अनेक छायाचित्रे ऑनलाइन पोस्ट करण्यात आली आहेत. अनेक युजर्सनी वेबसाइट मॅक रुमर्स डॉट कॉमच्या फोरमवर त्याची तक्रार केली आहे. फोनचा वरचा भाग - व्हॅल्यूम कंट्रोल बटनाजवळ दबाव पडला तर तिथे हा फोन वाकत आहे. हँजो नावाच्या एका आयफोन- 6 युजरने म्हटले आहे, की त्याच्या खिशामध्ये सलग 18 तास फोन राहिल्यानंतर त्यात बाक आला आहे. एका युजरने म्हटले आहे, की त्याने वाकलेला आयफोन 6 पुन्हा सरळ करण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या स्क्रिन क्रॅक झाली. साइटचे म्हणणे आहे, की या तक्रारींमध्ये वाढ होत आहे.
टेक्नॉलॉजी वेबसाइट गीक डॉट कॉमच्या रिपोर्टर रसेल होली म्हणाल्या, आयफोन-6 संदर्भातील अशा बातम्या वाचल्यानंतर मी माझा फोन तपासून पाहिला तर मलाही ही तक्रार सताऊ लागली आहे. सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरवर बेंड गेट हॅशटॅगने वाकलेल्या आयफोन 6ची छायाचित्रे पोस्ट केल्या गेल्या आहेत. अ‍ॅपलशी संबंधीत बातम्या करणार्‍या कल्ट ऑफ मॅक या वेबसाइटने दावा केला आहे, की अशी कोणती समस्या जाणवत नाही. सॅमसंग गॅलक्सी एस 4, आयफोन 5 एस आणि आयफोन 4, सोनी एक्सपिरीया झेड, ब्लॅकबेरी क्यू 10, एचटीसी इव्हो यासारख्या फोनमध्ये ही समस्या होती.
दबाव पडल्यानंतर कसा वाकला आयफोन पाहा व्हिडिओ पुढील स्लाइडमध्ये...

छायाचित्र : वाकलेल्या आयफोनचा सोशल नेटवर्किंग साइटवर युजर्सने अपलोड केलेला फोटो