आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दबंगपेक्षा चारपट अधिक कमावणार आयपीएल-6

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयपीएलचा सहावा सीझन. केवळ टायटलच 396.8 कोटी रुपयांमध्ये विकण्यात आले आहे. पाच वर्षे मुख्य प्रायोजक राहिलेल्या डीएलएफपेक्षा दुप्पट. आयपीएल-6 मधून बीसीसीआयची 950 कोटी रुपयांची कमाई होईल, असा अंदाज आहे. आयपीएल आता खेळापेक्षा जास्त मनोरंजनच बनले आहे. त्यामुळे दिव्य मराठीने आयपीएलचे सर्वाधिक बघितल्या गेलेले टीव्ही कार्यक्रम, हिट चित्रपट आणि अन्य स्पोर्ट्शी टीकात्मक तुलना केली आहे.

‘आम्ही विचारपूर्वकच एवढ्या किमतीला प्रायोजकत्व मिळवले आहे. त्याच्या पाच ते सहा पट कमाई करू, असा आम्हाला विश्वास आहे.’
- दीपिका वेरियर, कार्यकारी संचालक (विपणन), पेप्सी

पेप्सीला सहापट कमाईची आशा
पुन्हा होईल कोला-वॉर : पेप्सी आयपीएलचा अधिकृत भागीदार आहे, तर कोकाकोलाही दहा-दहा सेकंदांचे स्पॉट विकत घेऊन आपली मार्केटिंग करत आहे. 1996च्या क्रिकेट विश्वचषकाच्या वेळी हे युद्ध सुरू झाले होते. त्यावेळी कोकाकोला अधिकृत भागीदार होते. तेव्हा पेप्सीने स्पॉट विकत घेऊन प्रत्येक ओव्हरनंतर मार्केटिंग केली होती- ‘नथिंग ऑफिशियल अबाऊट इट!’

... पण केबीसीचे जाहिरात दर आयपीएलपेक्षा एक लाखाने महाग

अजूनही चार स्पोर्ट्स ब्रँड आयपीएलहून मोठे
जगातील फिफा, विम्बल्डन, सुपरबॉल आणि एफ 1 नंतर सगळ्यात मोठा स्पोर्ट ब्रँड आहे आयपीएल. सुपरबॉलमध्ये दहा सेकंदाच्या जाहिरातीचा दर 22 कोटी रुपयांपर्यंत जातो. ऑस्ट्रेलियाने बिग बॅश टी 20 टूर्नामेंट आणि इंग्लंडने आपली टी 20 टूर्नामेंट आयपीएलप्रमाणे यशस्वी करण्याचा प्रयत्न केला मात्र तो अपयशी ठरला.

आयपीएलची ब्रँड व्हॅल्यू
पहिली दोन वर्षे दुप्पट,
नंतर एक-तृतीयांश घटली

मालिकांमधील पात्रे देताहेत मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड
स्टार टीव्ही आयपीएलचा असोसिएट स्पॉन्सर आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक मालिकेतील पात्रे प्रत्येक मॅचच्या हीरोला अवॉर्ड देतील. मॅन ऑफ द मॅच अवॉर्डला स्टार प्लसच्या टॅगलाइनचेच नाव देण्यात आले आहे- ‘रिश्ता वही, सोच नई’ अवॉर्ड. त्यामागे भूमिका अशी की, मॅन ऑफ द मॅच खेळाडू इनोव्हेशन म्हणजेच नवा विचार आणतो.

1800 कोटींची टी-20 लीग दुनिया

टी-20 लीगच्या मिळकतीत आयपीएलचा वाटा दोन तृतीयांश

मात्र आयपीएल खेळाडूंच्या तुलनेत एनबीए देते 6.5 कोटी रुपये जास्त
21.72 कोटी रुपये (आयपीएल जगातील कुठल्याही स्पोर्ट्स लीगपैकी सर्वात जास्त वेतन देण्यात दुसर्‍या क्रमांकावर आहे. सर्वात जास्त 28.32 कोटी रुपये अमेरिकेत बास्केटबॉल लीग एनबीएमध्ये दिले जातात.)