आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL 8: If Dhoni Tells Me To Jump From The 24th Floor, I\'d Readily Do It: Ishant Sharma

धोनीने सांगितले तर २४ व्या मजल्यावरून उडी मारेन : ईशांत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - वेगवान गोलंदाज ईशांत शर्माने कर्णधार महेंद्रसिंग धोनीबाबत एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे. एका मुलाखतीत ईशांत म्हणाला, "धोनी माझ्या मोठ्या भावासारखा आहे. त्याच्या एका म्हणण्यावर मी काही विचार न करता २४ व्या मजल्यावरून उडी मारू शकतो.'

वर्ल्डकपच्या आधी ईशांतला दुखापतीमुळे भारतात यावे लागले होते. आता ईशांत इंडियन प्रीमिअर लीगमध्ये सनरायझर्स हैदराबादकडून क्रिकेटमध्ये पुनरागमनाचे प्रयत्न करतोय. दुखापतीमुळे मला फिजिआेने १० षटकांपेक्षा अधिक गोलंदाजी करण्यास मनाई केली आहे, असे ईशांतने नमूद केले.

माहीने मला निराशेतून बाहेर काढले
मी जखमी झालो होतो तेव्हा माहीने मला सावरण्यास खूप मदत केली. मी निराशेत बुडालो होतो. त्याने मला निराशेतून बाहेर काढले. धोनीसारख्या कर्णधाराने २४ व्या मजल्यावरून उडी मारण्यास सांगितले, तर मी निश्चित मारेन. वर्ल्डकपमध्ये खेळू न शकल्याचे मला दु:ख आहे, असेही ईशांतने म्हटले.