आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL Chief Operating Officer Sundar Raman Resigns

IPL चे COO रमन यांचा राजीनामा, मॅच फिक्सिंगचा झाला होता आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चे सीओओ सुंदर रमन यांनी आज (मंगळवार) आपल्‍या पदाचा राजीनामा दिला असून, बीसीसीआयने तो मंजूर केला आहे. 5 नाव्‍हेंबरला त्‍यांना अधिकृत पदमुक्‍त केले जाणार आहे. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणाची चौकशी करणाऱ्या लोढा समितीने रमन यांच्‍या कामावर प्रश्‍न उपस्‍थ‍ित केले होते. त्‍या अनुषंगाने त्‍यांनी राजीनामा दिल्‍याचे सांगितले जात आहे.
रमन यांच्‍यावर काय आहेत आरोप
मॅच फिक्सिंग करणाऱ्या एका बुकीसोबत रमन यांनी आठ वेळा संभाषण केले. त्‍यांनी एन. श्रीनिवासनचे जावाई गुरुनाथ मयप्पन आणि राज कुंद्रा यांच्‍यावर कारवाई केली नाही. शिवाय रामनही चेन्नई संघाची अंतर्गत माहिती सट्टेबाजांना देत होते, असे आरोप मुद्‌गल समितीने आपल्‍या अहवालात केले आहेत.

कोण आहेत सुंदर रमन
> अप्लाइड सायन्समध्ये पदवीधर असलेल्‍या सुंदर रमन यांना 1993 मध्‍ये भारतातील कोणत्‍या आयआयएम इंस्टीट्यूटमध्‍ये प्रवेश मिळाला नाही.
> त्‍यानंतर त्‍यांनी मुंबईच्‍या NMIMS मधून जाहिरात आणि वृत्‍तपत्रविद्यामध्‍ये स्पेशलाइजेशन केले.
> 1995 मध्‍ये हिंदुस्तान थॉम्पसन असोसिएट्सचे माध्‍यम सल्‍लागार म्‍हणून त्‍यांनी आपले करिअर सुरू केले.
> काहीच वर्षांत रमन हे माइंड शेयर इंडिया कंपनी (मीडिया एजेंसी ग्रुप) चे एमडी बनले.