नवी दिल्ली - इंडियन प्रीमियल लीगच्या (आयपीएल) आठव्या पर्वाला सुरुवात झाली असून तिसर्याच दिवशी फिक्सिंगचे सावट आले आहे. राजस्थान रॉयल्सच्या एका खेळाडूने फिक्सिंगसाठीची ऑफर आल्याचा दावा केला आहे. तर, दुसरीकडे गेल्यावर्षी आयसीसीने
टीम इंडियाच्या एका स्टार खेळाडूला हॉटेलमध्ये विवस्त्र अवस्थेत पाहिले होते. यंदा आयसीसी आयपीएलमध्ये खेळत असलेल्या खेळाडूंवर नजर ठेवून आहे.
आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी पथकातील सूत्रांच्या माहितीनुसार एका टीव्ही चॅनलने खुलासा केला आहे, की 2014 मध्ये एका होम सीरिज दरम्यान, टीम इंडियाचा एक स्टार खेळाडू टीम थांबली होती त्या हॉटेलमध्ये आक्षेपार्ह्य स्थितित आढळला होता. त्याच्या अंगावर एकही कपडा नव्हता. या खेळाडूचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे.
टीव्ही चॅनेलचा दावा आहे, की हॉटेलमध्ये सापडलेला स्टार खेळाडू वर्ल्डकपमध्ये खेळला होता आणि आता आयपीएलमध्येही खेळत आहे. आयसीसी भ्रष्टाचारविरोधी पथक आयपीएलच्या आठव्या सीजनवर बारीक नजर ठेवून आहे. त्यांनी खेळाडूंना सक्त ताकिद दिली आहे, की त्यांनी सांगितलेल्या सर्व नियम आणि आदेशांचे काटेकोर पालन झाले पाहिजे.
नोव्हेंबर 2014 मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली गेली होती. त्याआधी ऑक्टोबरमध्ये भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामने खेळले होते. सहा महिन्यांपूर्वी भारताने मायदेशात खेळलेले हेच सामने होते. चॅनेलने याच सामन्यांदरम्यान टीम इंडियाचा खेळाडू कथितरित्या आढळल्याचा दावा केला आहे.
पुढील स्लाइडवर वाचा, IPL-8 वर 'मॅच फिक्सिंग'चे सावट