आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL News In Marathi, Sushilkumar Shinde, Union Home Minister

निवडणुकांमुळे आयपीएलला सुरक्षा देण अशक्य - सुशीलकुमार शिंदे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा आणि इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पर्धा एकाच वेळी येत असल्यामुळे या वर्षी आयपीएलला सुरक्षा देणे शक्य नसल्याचे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मंगळवारी सांगितले.सुरक्षा दले निवडणुकांसाठी तैनात केली जातील, त्यामुळे आयपीएलसाठी सुरक्षा देऊ शकत नसल्याचे शिंदे यांनी बीसीसीआयला कळवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. निवडणुकीनंतर होणार्‍या टी 20 स्पध्रेसाठी केवळ सुरक्षा पुरवण्यात येणार आहे.

आयपीएल सामने 9 एप्रिल ते 3 जूनदरम्यान होण्याची शक्यता आहे. भुवनेश्वरमध्ये 28 फेब्रुवारी रोजी झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीत संघांच्या फ्रँचायझींनी स्पध्रेचा महत्त्वाचा भाग तात्पुरता स्थगित करण्याची सूचना केली. बीसीसीआयने ही स्पर्धा दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि युनायटेड अरब अमिरातमध्ये घेण्याचा पर्याय ठेवला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निमलष्करी दलाच्या 2 लाख जवानांसह राज्यातील पोलिस दल तैनात असतील. गृहमंत्रालयाने सुरक्षा दलांच्या तैनातीचा आढावा घेणे सुरू केले असल्याचे सूत्रांनी सांगितले.