आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL Spot Fixers May Be Organised Criminal, Court Remark

आयपीएल स्पॉट फिक्सर्सचे संघटित गुन्हेगारांशी संबंध आहे , न्यायालयाचे मत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या काही आरोपींचे संघटित गुन्हेगारांशी संबंध असून त्यांच्याविरूद्ध मकोका अन्वये खटला चालू शकतो, असे मत न्यायालयाने नोंदवल्यामुळे या प्रकरणातील आरोपींच्या अडचणी वाढल्या आहेत.


स्पॉट फिक्सिंग प्रकरणात उपलब्ध पुरावे पाहता या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या काही आरोपींचे संघटित गुन्हेगारी टोळ्यांशी थेट संबंध किंवा त्यांच्या ते संपर्कात असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळेच संघटित गुन्हेगारी टोळ्या बेटिंगचे रॅकेट चालवत आहेत. त्यांच्याविरुद्ध मोक्काच्या कलम 2 (1) (ई) आणि 3 अंतर्गत खटला चालवला जाऊ शकतो, असे मत अतिरिक्त सत्र न्यायमूर्ती धर्मेश शर्मा यांनी नोंदवले.