आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ipl Spot Fixing Analysis Of Supreme Court Committee Verdict

IPL सट्टेबाजी: चेन्नई, राजस्थान दाेन वर्षे बाद; मयप्पन, कुंद्रावर आजन्म बंदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फैसले की घडी... जस्टीस आर.एम. लोढा यांनी आयपीएल स्पॉट फिक्सिंगचा निर्णय दिला. - Divya Marathi
फैसले की घडी... जस्टीस आर.एम. लोढा यांनी आयपीएल स्पॉट फिक्सिंगचा निर्णय दिला.
नवी दिल्ली - आयपीएलमधील सट्टेबाजीप्रकरणी आतापर्यंतचा सर्वात यशस्वी संघ चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्सवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. २०१३ मध्ये सट्टेबाजी करणाऱ्या या संघांचे मालक गुरुनाथ मयप्पन आणि राज कुंद्रा यांच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली आहे. यांचा क्रिकेटच्या कुठल्याही सामन्याशी संबंध असणार नाही.

सर्वोच्च न्यायालयाने जानेवारीत माजी सरन्यायाधीश आर. एम. लोढा यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यांची समिती स्थापन केली होती. सट्टेबाजीचे आरोपी मयप्पन, कुंद्रा आणि दोन फ्रँचायझी-सीएसके मालिक इंडिया सिमेंट्स लिमिटेड आणि राजस्थान रॉयल्सचे मालक जयपूर आयपीएल यांची शिक्षा समितीला निश्चित करायची होती. मंगळवारी निकाल सुनावताना न्यायमूर्ती लोढा समितीचे इतर दोन सदस्य सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अशोक भान आणि आर. रवींद्रनही उपस्थित होते. शिस्तीच्या आधारावर हा निर्णय घेण्यात आल्याचे समितीने म्हटले आहे. मयप्पन आणि कुंद्रा यांच्या हालचाली खासगी होत्या, हा युक्तिवाद समितीने खारीज केला.
क्रिकेट बदनाम
क्रिकेट, बीसीसीआय आणि आयपीएलच्या प्रतिष्ठेला या दोघांमुळे धक्का पोहोचला. या खेळातील गैरप्रकार बऱ्याच अंशी दूर करता येतील.
- आर. एम. लोढा, माजी सरन्यायाधीश
क्रिकेटची सफाई
शिक्षा कठोर आहे. त्यामुळे क्रिकेटवर प्रतिकूल परिणाम होईल, असे अनेक लोकांना वाटत आहे. परंतु हा तात्पुरता झटका आहे. क्रिकेटची सफाई होईल. लोक आयपीएलवर विश्वास ठेवू लागतील, असे मला वाटते.
- न्यायमूर्ती मुकुल मुदगल, (चौकशी समितीचे अध्यक्ष)

पुढील स्लाइडमध्ये पाच प्रश्नांतून समजून घ्या निर्णयाचा अन्वयार्थ