आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL Spot Fixing: BCCI Chief N Srinivasan Reluctant To Resign Instead Of Supreme Court Hard Stand

खुर्चीचा मोह सुटेना, सुप्रीम कोर्टाचा अल्टिमेटम श्रीनिवासन यांना अमान्य!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टाच्या कडक भूमिकेनंतरही क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष एन. श्रीनिवासन पद सोडण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत. मंगळवारपासूनच ते अनेक वकीलांच्या संपर्कात आहेत. आज (बुधवार) ते म्हणाले, 'मी काहीही चूकीचे केलेले नाही आणि कोणीही मला बीसीसीआयमधून बाहेर काढू शकत नाही.' दुसरीकडे बीसीसीआयनेही स्पष्ट केले आहे, की श्रीनिवासन राजीनामा देणार नाहीत. गुरुवारी कोर्टाच्या निर्णयानंतरच पुढील भूमिका स्पष्ट केली जाईल. बीसीसीआयचे उपाध्यक्ष शिवलाल यादव म्हणाले, 'कोर्टाच्या निर्णयानंतरच आम्ही आमची पुढील भूमिका स्पष्ट करु.' मात्र, मंगळवारी न्यायमूर्ती ए. के. पटनायक यांच्या पीठाने सांगितले की, जोपर्यंत श्रीनिवासन राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत बीसीसीआयच्या वकीलांचा युक्तिवादही ऐकून घेतला जाणार नाही.
मंगळवारी सुप्रीम कोर्टाने श्रीनिवासन यांच्यासह बीसीसीआयला फटकारले. श्रीनिवानसन त्या पदावर असे पर्यंत आयपीएल सट्टेबाजी आणि स्पॉट फिक्सिंगची निःपक्षपाती चौकशी होणे शक्य नाही.
क्रिकेटला लागलेली कीड नष्ट करायची असेल तर श्रीनिवासन यांना राजीनामा देण्याशिवाय गत्यंतर नाही. खुर्चीला चिकटून बसण्याच्या त्यांच्या वर्तनाची घृणा वाटते, अशी प्रतिक्रियाही न्यायालयाने सुनावणीत व्यक्त केली.
श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मयप्पन फिक्सिंगमधील प्रमुख आरोपी आहे.

पुढील स्लाइडमध्ये, न्यायाधीश v/s वकील