आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IPL Spot Fixing: BCCI Chief N Srinivasan Reluctant To Resign Instead Of Supreme Court Hard Stan

श्रीनिवासन पद सोडण्यास तयार, कोर्टात धोनीवर खोटी माहिती दिल्याचा आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आयपीएल सट्टेबाजी आणि स्पॉट फिक्सिंग प्रकरणात सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर एन. श्रीनिवासन यांनी यू-टर्न घेत बीसीसीआय अध्यक्षपद सोडण्याची तयारी दर्शविली आहे. आज (गुरुवार) त्यांनी कोर्टाला सांगितले, की बीसीसीआयचे अध्यक्षपद सोडण्यास तयार आहे. कोर्टाने माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी बीसीसीआचे काम पाहाण्याचा प्रस्ताव दिला आहे. आजच्या सुनावणी दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे ही नाव आले. टीम इंडियाच्या कर्णधाराने चुकीचा जबाब नोंदवल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
सुप्रीम कोर्टाने चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का दिला आहे. आयपीएल-7 मध्ये दोन्ही संघाने खेळु नये असे कोर्टाने म्हटले आहे. त्यामुळे 16 एप्रिल पासून सुरु होत असलेल्या आयपीएल स्पर्धेत या संघांना सहभागी होता येणार नाही. या प्रकरणावर अंतरिम निर्णय शुक्रवारी होणार आहे.
स्पॉट फिक्सिंगमध्ये धोनीचे नाव
आयपीआल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या माजी न्या. मुकूल मुदगल समितीच्या चौकशी अहवालावर सुरु असलेल्या सुनावणी दरम्यान टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे नाव आले. याचिकाकर्त्यांचे वकील हरीश साळवे यांनी या प्रकरणात धोनी देखील दोषी असल्याचे म्हटले. चौकशीसमितीला धोनीने मयप्पनबाबत चुकीची माहिती दि्ल्याचा त्याच्यावर आरोप आहे. ते म्हणाले, धोनीने माजी न्या. मुदगल समितीच्या चौकशीत खोटी माहिती दिली. त्यासोबतच अॅड. साळवेंनी चेन्नई सुपरकिंग्ज संघ बरखास्त करण्याची मागणी केली. साळवे म्हणाले, धोनी इंडिया सिमेंट्सचा कर्मचारी आहे. त्यामुळेच येथे त्याचा हितसंबंध आला आहे.
काय म्हणाला होता धोनी
धोनीने मुदगल समितीसमोर सांगितले होते, की गुरुनाथ मयप्पन फक्त क्रिकेट चाहता आहे. चेन्नई संघाशी त्याचा संबंध नाही, किंवा तो संघाचा प्रवर्तक वा मालक नाही.
साळवेंनी धोनीच्या या वक्तव्यावर बोट ठेवत फिक्सिंगमध्ये तो दोषी असल्याचे म्हटले. जवळपास एक तासांच्या युक्तिवादात त्यांनी बीसीसीआयने चौकशी समितीसमोर खोटी माहिती दिल्याचे म्हटले आहे.

पुढील स्लाइडमध्ये, आयपीएलच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह