आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवघी आयपीएल स्पर्धा फिक्सिंगने बरबटलेली, विंदू दारासिंगचा गौप्यस्फोट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आयपीएल-6 मध्ये सट्टेबाजीत सहभाग असलेला अभिनेता विंदू दारासिंगने अख्खी आयपीएल स्पर्धा फिक्सिंगने बरबटलेली असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. यात रॉयल चॅलेंर्जस बंगळुरूचे मालक विजय मल्ल्याही सहभागी असल्याचे विंदूने एका चॅनलच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये सांगितले आहे.
मुंबई पोलिसांनी आयपीएल-6 मध्ये सट्टेबाजीच्या आरोपाखाली विंदूला अटक केली होती. विंदू म्हणाला, आयपीएलमध्ये खरे युद्ध बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन व स्पर्धेचे माजी आयुक्त ललित मोदी यांच्यात सुरू आहे. श्रीनिवासनला बाहेर काढण्याच्या संधी मोदी शोधत आहे.