आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत आत्‍मघातकी हल्‍ल्‍याचा कट, आयपीएलवरही सावट; आयबीचा इशारा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोस्‍टन/नवी दिल्‍ली- अमेरिकेच्‍या बोस्‍टन शहरात मॅरेथॉनदरम्‍यान झालेल्‍या बॉम्‍बस्‍फोटांप्रकरणी तपास यंत्रणा अद्याप अंधारातच आहे. स्‍फोट कोणी घडविला, याबाबत कोणताही सुगावा लागला नाही. सर्वप्रथम तालिबानवर संशय व्‍यक्त करण्‍यात आला होता. परंतु, तालिबानने बॉम्‍बस्‍फोटात हात असल्‍याचे फेटाळले आहे. दरम्‍यान, भारतातही कडक सुरक्षेचा इशारा देण्‍यात आला आहे. भारतात सुरु असलेल्‍या आयपीएल स्‍पर्धेवरही हल्‍ल्याचे सावट असल्‍याचा इशारा आयबीने दिला आहे. महाराष्‍ट्रातही दहशतवादी हल्‍ल्‍याची शक्‍यता असल्‍याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी सांगितले असून त्‍यासाठी महिलांना पाकिस्‍तानात प्रशिक्षण देण्‍यात आल्‍याचेही ते म्‍हणाले.

बोस्‍टन बॉम्‍बस्‍फोट हा दहशतवादी हल्‍लाच होता, असे एफबीआयने स्‍पष्‍ट केले आहे. अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष बराक ओबामा जनतेला संयम बाळगण्‍याचे आवाहन करतानाच कोणत्‍याही ठोस निष्‍कर्षापर्यंत पोहोचण्‍याची घाई करु नये, असेही सांगितले. बोस्‍टनच्‍या दोषींना हुडकून काढू आणि त्‍यांना शिक्षा देऊ, असे आश्‍वासन ओबामा यांनी अमेरिकेच्‍या जनतेला दिले.