आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AK-47 घेऊन जंगलांत फिरते ही IPS, दहशतवाद्यांचा करत आहे खात्मा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अासामच्या जंगलांमध्ये दहशतलाद्यांच्या विरोधात लढणाऱ्या IPS संजुक्ता पराशर. - Divya Marathi
अासामच्या जंगलांमध्ये दहशतलाद्यांच्या विरोधात लढणाऱ्या IPS संजुक्ता पराशर.
नवी दिल्ली - अासामची पहिली महिला IPS अधिकारी संजुक्ता पराशर सोनितपूर जिल्ह्यातील जंगलांमध्ये दहशतवाद विरोधी ऑपरेशन चालवत आहे. त्यांच्या ऑपरेशनचे फोटो नुकतेच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यात संजुक्ता संपूर्ण टीमबरोबर AK 47 रायफलसह गस्त घालत असल्याचे दिसते.

गेल्या महीन्यांपासून संजुक्ता या अँटी बोडो दहशतवादी मोहीमेवर त्यांच्या संपूर्ण टीमसह काम करत आहेत. या ऑपरेशन अंतर्गत आतापर्यंत 16 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. तर 64 दहशतवाद्यांना अटक करून त्यांच्याकडील शस्त्रास्त्रे आणि दारु गोळा जप्त करण्यात आला आहे. संजुक्ता पराशर आणि त्यांच्या टीमने 2014 मध्ये 175 दहशतवाद्यांना अटक केली आहे तर 2013 मध्ये 172 दहशतवाद्यांना तुरुंगात पाठवले होते.

दिल्लीतून पूर्ण केले शिक्षण
संजुक्ता यांनी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून पीएचडी केली आहे. त्या 2006 बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. आसामच्या पहिल्या महिला आयपीएस म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. त्यांना एक मुलगाही आहे.

धार्मिक हिंसेविरोधात पहिले ऑपरेशन
संजुक्ता यांची 2008 मध्ये पहिली पोस्टींग माकुममध्ये असिस्टंट कमांडंट पदावर झाली होती. काही काळातच त्यांना उदालगिरीमध्ये झालेल्या बोडो आणि बांगलादेशी यांच्यातील धार्मिक हिंसेच्या प्रकरणानंतर कारवाई करण्यासाठी पाठवण्यात आले.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संजुक्ता पराशर यांचे काही निवडक PHOTOS