आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीयूच्या प्राध्यापकांनी शोधला दुर्मिळ कोळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - गुरु गोविंदसिंग इंद्रप्रस्थ विद्यापीठाच्या (आयपीयू) विद्यार्थ्यांनी ५ वर्षांच्या अथक परिश्रमानंतर दुर्मिळ कोळी शोधून काढला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा कोळी भगवान जगन्नाथासारखा दिसतोय. त्यामुळे जेव्हा त्याच्या नामकरणाची वेळ आली तेव्हा त्याचे एस. जगन्नाथ असे नाव ठेवण्यात आले.

या नवीन शोधाचे मेंटर आणि हरपेटोलॉजिस्ट आयपीयूमधील सहायक प्राध्यापक डाॅ. संजय केसरी दास सांगतात की, युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांच्या टीमने या शोधाची सुरुवात २०१० मध्ये केली होती. शोधाला जुलै २०१५ मध्ये प्रसिद्ध करण्यात आले. हा शोध इंटरनॅशनल जनरल आॅफ सायन्स अँड रिसर्चमध्ये शेवटी प्रकाशित झाले. जे स्वित्झर्लंडच्या वलर्ड स्पायडर कॅटलाॅगचा डेटाबेस ठेवते आहे. दास सांगतात की, दिल्ली येथील असोला भाटी वाइल्ड लाइफ सँक्च्युअरीच्या अरावली डोंगराळ भागात या स्पायडरचा शोध लागला. आपल्यात स्पायडरच्या अद्वितीय एलिमेंट्स आहेत. आम्ही सँक्च्युअरीच्या आत पानांवर या स्पायडरचे चालणे, खाणे आणि इतर व्यवहारांचा, हालचालींचा अभ्यास केला. विशेष गोष्ट म्हणजे नर स्पायडर एस. जगन्नाथची लांबी ३.७५ मिलिमीटर आहे, तर मादी स्पायडर एस. जगन्नाथची साइज त्याच्या तुलनेत सुमारे दुप्पट ६.५ मिलिमीटर आहे. त्याचे मोठे काळे डोळे असून ते कारच्या हेडलाइटसारखे दिसतात. डाॅ. दास सांगतात की, अशा प्रकारच्या दुर्मिळ स्पायडर प्रजाती आतापर्यंत जगात ३४ होत्या. या शोधानंतर त्यांची संख्या ३५ झाली आहे. यापैकी २७ प्रजाती अाफ्रिकेत आणि अाशियात ८ प्रजाती मिळतात. या आठपैकी एक प्रजाती भारतात शोधण्यात आली आहे. आम्ही हे नोटीस केले आहे की, या स्पायडर प्रजातीचा रंग आणि दिसण्यात वेगळेपण आहे. त्याच्यावर तीन पांढरे ठिपके आहेत आणि पांढऱ्या रेषा आहेत. तो हुबेहूब भगवान जगन्नाथच्या मुखवट्यासारखा दिसत आहे. त्यामुळे त्याचे नाव एस. जगन्नाथ ठेवण्यात आले आहे. आता या नावाने तो वर्ल्ड स्पायडर कॅटलाॅगमध्ये दाखल आहे.

हा स्पायडर मुंग्या, किडे आणि फुलपाखरांचे भक्षण करतो, जे आकाराने त्याच्यापेक्षाही मोठे आहेत. हा फारच चपळ असून लांब उडीही मारतो. त्यामुळे याला जंपिंग स्पायडरही नाव देण्यात आले आहे. डाॅ. दास म्हणतात की, ग्लोबल वाॅर्मिंग आणि वातावरण बदलादरम्यान येथे जीव- जंतूंच्या अनेक प्रजाती नष्ट होत आहेत, तेथे अशा प्रकारच्या स्पायडर प्रजाती मिळणे, एक चांगला अनुभव आहे. कारण की हा दिल्लीसारख्या शहरी भागातील एक नवीन प्रजातीचा शोध आहे. त्यामुळे हेही आवश्यक झाले आहे की, आम्ही बायोडायव्हर्सिटी क्षेत्राचा योग्य दस्तऐवज तयार करायला हवा. या शोधात आयपीयू पीएचडी शोधार्थी शुभी मलिक आणि एमएससीचे विद्यार्थी भूपिंद्र प्रसाद विधलचेही मोलाचे योगदान ठरले आहे.