नवी दिल्ली - इराकमधील हिसांचाराच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मुद्यावर मोदी सरकारची सुरवातीलाच मोठी परीक्षा आहे. इराकमधील मोसूल शहरात असलेल्या 40 भारतीय नागरिकांशी कोणताही संपर्क होत नाही. त्यांचे
आयएसआयएस या दहशतवादी संघटनेने अपहरण केल्याची शक्यता आहे. बेपत्ता भारतीयांचे कुटुंबिय आज (गुरुवार) पंजाबहून दिल्लीत येऊन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेणार आहेत. दुसरीकडे, इराकने अमेरिकेला विनंती केली आहे, की आता निर्णयक पाऊल उचला. मात्र, अमेरिकेने अजून सकारात्मक इशारा दिलेला नाही. भारत सरकारने बुधवारी सायंकाळी अधिकृतरित्या 40 भारतीयांचे अपहरण झाल्याचे मान्य केले आहे.
भारत सरकारचे प्रयत्न
भारत सरकार अपहरण झालेल्या नागरिकांना सुरक्षीत परत आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे.
- भारत आयएसआयएसशी संपर्क करण्याचे सर्व प्रयत्न करीत आहे. त्यासाठी सद्दाम हुसेन यांच्या कार्यकाळातील सैन्य अधिका-यांकडे मदतीची मागणी केली आहे. सुत्रांची माहिती आहे, की सद्दामच्या कार्यकाळातील हे लोक आता आयएसआयएसचा हस्सा आहेत आणि ते अपहरणाचा गुंता सोडवण्यात मदत करु शकतात.
- अपहरण झालेल्यांमध्ये तुर्कस्थान आणि बांगलादेशींचाही समावेश आहे. तुर्कस्थानचे सरकार इराकच्या संपर्कात असून हा तिढा सुटेल असा त्यांना विश्वास आहे. भारत आता तुर्कस्थानच्या प्रयत्नांवरही नजर ठेवून आहे.
- भारताने विशेष दुत म्हणून सुरेश रेड्डी यांना इराकला पाठवले आहे. रेड्डी यांचे इराकसोबत चांगले संबंध असल्याचे मानले जाते. त्यामुळे ते या प्रकरणी त्यांच्या संबंधाचा वापर करुन यात तोडगा काढू शकतात.
संग्रहित छायाचित्र - आयएसआयएस या दहशतवादी संघटनेने इराकमध्ये अनेक सैनिकांना ठार केले आहे. त्यांनी ऑनलाइन पोस्ट केलेले संग्रहित छायाचित्र.