नवी दिल्ली- कोलकाता राजधानी एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना दिल्या जाणार्या जेवणात झुरळ निघाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत रेल्वे प्रशासनाने इंडियन रेल्वेज् कॅटरिंग अँड टूरिझम कॉरपोरेशनवर (ITCTC) दंडात्मक कारवाई केली आहे. सुमारे एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. याशिवाय अनेक कॅटरर्सवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ITCTC सह अन्य नऊ कॅटरर्सवर रेल्वेने एकूण 11.50 लाख रुपयांचा दंड आकारला आहे.
13 एक्स्प्रेसमध्ये मिळाले होते निकृष्ट गुणवत्तेचे जेवण...
रेल्वे मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकार्याने दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे एक्स्प्रेसमधून दिल्या जाणार्या जेवणाची गुणवत्ता तपासण्यासाठी गेल्या महिन्यात विशेष मोहिम हाती घेण्यात आली होती. तपासणीदरम्यान काही एक्स्प्रेसमधील जेवणात अनेक त्रुटी आढळून आल्या. तसेच राजधानी एक्स्प्रेसमधील जेवणात झुरळ आढळून आले. या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून आयआरसीटीसीवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. आयआरटीसीवर एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे..
गेल्या 23 जुलैला कोलकाता राजधानी एक्स्प्रेसमधील जेवनात झुरळ आढळून आले होते. याशिवाय 13 रेल्वे गाड्यामधील जेवनाची गुणवत्ता अतिशय हीन होती. आयआरसीटीसीसह आरके असोसिएट्स, सनशाइन कॅटर्स, सत्यम कॅटर्स, वृंदादावन फूड प्रोडक्ट्सला दंड ठोठावण्यात आला होता.
(फाइल फोटो: रेल्वे एक्स्प्रेसमध्ये दिले जाणारे जेवण)