आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • IRCTC Among Nine Caterers Fined By Railways For 'bad Food'

रेल्वेतील निकृष्ट जेवण; केटरर्सना 11 लाख दंड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्यावरून रेल्वे विभागाने केटरिंग आणि पर्यटन महामंडळासह (आयआरसीटीसी) नऊ केटरर्सविरोधात दंडात्मक कारवाई केली आहे. केटरर्सना 11.50 लाख रुपये दंडापोटी द्यावे लागणार आहेत.

रेल्वेच्या विशेष मोहिमेत 23 जुलै रोजी काही रेल्वे गाड्यांमध्ये घेतलेल्या भोजन व्यवस्थेच्या पाहणीत जेवणाचा दर्जा निकृष्ट असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे आयआरसीटीसी तसेच सत्यम केटरर्स, आर. के. असोसिएट्स, सनशाइन केटरर्स, वृंदावन फूड प्रॉडक्ट्स यांच्यावर दंडाची कारवाई करण्यात आली.

जेवणात झुरळ...
कोलकाता राजधानी एक्स्प्रेसमध्ये झालेल्या तपासणीत जेवणात झुरळ सापडले होते. त्यावर आयआरसीटीसीला एक लाख रुपयांचा दंड लावण्यात आला आहे.