आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IRCTC ची सेवा महागली, रिझर्व्हेशनसाठी मोजावे लागतील दुप्पट रुपये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालंधर/मुंबई/नवी दिल्ली- रेल्वे मंत्रालय अंतर्गत येणार्‍या इंडियन रेल्वे कॅटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) ऑनलाइन तिकिट बुकिंगवरील सेवा शुल्कात (सर्व्हिस चार्ज) दुप्पट वाढ केली आहे. स्लीपर तिकिट बुकिंगवर 10 ऐवजी 20 तर एसी तिकिटाच्या बुकिंगवर 20 ऐवजी 40 रुपये मोजावे लागतील. एक एप्रिलपासून ही दरवाढ लागू करण्‍यात आली आहे. एसी क्लासच्या प्रवाशांना 14% सेवा कर देखील भरावा लागत आहे.
तिकिट बुकिंग करणे तसेच नंतर ते कन्फर्म करणे यात कंपनीला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. रेल्वे मंत्रालयाची परवानगी मिळाल्यानंतरच सेवा शुल्क दुप्पट करण्‍यात आले आहे. सेवा शुल्कात वाढ झाल्यानंतर पहिल्या दिवशी सुमारे दोन कोटी रुपयांची कमाई झाल्याचे
आयआरसीटीसीचे सीपीआरओ संदीप दत्ता यांनी सांगितले.