आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेचे वेटिंग तिकिट असणा-या प्रवाशांना मिळणार, कमी पैशात विमान प्रवासाची ऑफर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - रल्वेचे तुमचे तिकिट वेटिंग लिस्टमध्ये असेल तर आता जास्त घाबरण्याची गरज नाही. अशा वेळी रेल्वेतर्फे तुम्हाला डिस्काऊंट रेटमध्ये विमानाचे तिकिट मिळवून दिले जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना कमी खर्चात विमान प्रवासाचा आनंद घेता येईल पण त्याचबरोबर त्यांचा वेळही वाचणार आहे.

2 एअरलाईन्सबरोबर करार
रेल्वेतील वेटिंगमुळे त्रस्त असलेल्या प्रवाशांचा त्रास कमी करण्यासाठी आयआरसीटीसीने गो एअर आणि स्पाइस जेट या कंपन्यांबरोबर करार केला आहे. त्यानुसार रेल्वे वेटिंग लिस्ट असणाऱ्या प्रवाशांचे विमान तिकिट अखेरच्या क्षणी 'काॉम्पिटेटिव्ह' फेअर रेटवर उपलब्ध करून दिले जाईल. स्पाइस जेटच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या नव्या योजनेने रेल्वे आणि स्पाइस जेट दोघांना फायदा मिळू शकतो. विमानात सीट रिकामे असेल तर रेल्वेच्या प्रवाशांना विमान प्रवासाची संधी मिळेल.

तिकिटावर सुमारे 40 % डिस्काऊंट
आयआरसीटीसीचे पब्लिक रिलेशन मॅनेजर संदीप दत्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वेने ही योजना सुरू केली असून तिचा लाभ घेण्यासाठी प्रवाशाकडे प्रवासाच्या तारखेच्या तीन दिवस आधी बूक केलेले आणि चार्ट लागूनही कनफर्म न झालेले तिकिट असणे गरजेचे आहे. अशा तिकिट धारकांना कमी भाडे आकारून विमानाचे तिकिट उपलब्ध करून दिले जाईल. त्यांनी सांगितले की, या स्कीममध्ये प्रवाशांना 30 ते 40 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट दिले जाते. अशा स्थितीत 5-6 हजार रुपयांचे तिकिट 3000 रुपयांत बूक केले जाते.

असे बूक करता येईल तिकिट
अशा प्रकारच्या प्रवाशांना आयआरसीटीसी त्यांच्याकडून एक ईमेल पाठवेल. त्यात त्यांना विमान तिकिटाचे बुकींग करता येईल, असे सांगितले जाईल. त्यानंतर प्रवाशाला irctc.co.in वर जाऊन लॉगइन करावे लागेल. त्यानंतर ट्रेन तिकिट लिस्टमधून प्रवाशाचे नाव शोधावे लागेल. त्यानंतर लगेचच फ्लाइट सर्चचे ऑप्शन समोर येईल. त्यावर क्लिक करून तिकिट बूक करावे लागले. पण त्या शहरासाठी फ्लाइट उपलब्ध असेल तरच त्या स्कीमचा फायदा होईल.

विमान तिकिटाचे रिफंड मिळणार नाही
प्रवाशांना विमानाच्या तिकिटाचे पूर्ण पैसे मोजावे लागतील. त्यासाठी ट्रेन बुकिंगच्या रिफंडमधून पैसे कापता येणार नाही. त्यासाठी रिफंड ठरलेल्या प्रकियेनुसारच होईल. पण विमानाचे तिकिट अगदी अखेरच्या क्षणी बूक होणार असते. त्यामुळे त्यात रिफंड होत नाही. त्यामुळे वेळेवर विमानतळावर पोहोचणे हा एकमेव पर्याय शिल्लक राहतो.