आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिक्षा यादीतील प्रवाशांचे तिकीट कन्फर्म झाल्यानंतर आता येणार SMS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - रेल्वे प्रवास करणा-यांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वेचे तिकीट बुकींग करताना तुमचे तिकीट प्रतिक्षा यादीत असले, तर शेवटच्या क्षणी तुमचे सीट बुक झाले किंवा नाही याची खातरजमा करण्यासाठी प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या त्रासातून प्रवाशांची आता सुटका होणार आहे. प्रतिक्षा यादीतील तिकीट कन्फर्म झाल्याचा एसएमएस आता रेल्वे प्रवाशांना पाठविणार आहे. त्यामुळे तुमचा प्रवास आरामदायी होणार आहे.
ज्या प्रवाशांचे तिकीट प्रतिक्षा यादीत असेल, आणि प्रवास सुरु करण्याच्या आधी ते कन्फर्म झाले असेल, तर त्याची माहिती आता आयआरसीटीसी संबंधीत प्रवाशाला एसएमएस द्वारे कळविणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिका-यांने सांगितले आहे. लवकरच ही सेवा सुरु केली जाणार असल्याचे अधिका-याने म्हटले आहे.
वरिष्ठ अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, तिकीट बुकींगवेळी प्रवाशी जो मोबाईल क्रमांक नोंदवतील त्याच क्रमांकावर तिकीट कन्फर्मेशनचा एसएमएस मिळणार आहे. चार्ट तयार झाल्यानंतर वेटींग लिस्टीमधील ज्या प्रवाशांचे तिकिट कन्फर्म होईल, त्यांनाच फक्त हा एसएमएस पाठविला जाणार आहे.
सध्या तिकीट कन्फर्मेशनची माहिती घेण्यासाठी प्रवाशांना 139 या दुरध्वनी क्रमांकवर माहिती मिळते. त्याशिवाय irctc.co.in, indianrailway.gov.in या वेबसाइटवर तुमच्या तिकीटाचा पीएनआर क्रमांक दिल्यानंतर आरक्षण स्थिती कळते किंवा संबंधीत स्टेशनवर जाऊन चार्ट पाहावा लागतो. प्रवाशांचा हा त्रास कमी करण्यासाठी क्रिस (रेल्वेची तंत्रज्ञान संस्था) एसएमएसवर आधारित सॉफ्टवेअर विकसित करण्याचा प्रयत्न करीत आहे.