आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Irreparable Damage To Govt's Reputation By Antony's Remarks: Advani

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अँटनींच्या विधानामुळे यूपीए सरकारच्या प्रतिमेस तडा : अडवाणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पाकिस्तानप्रकरणी संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांच्या वक्तव्यातील चुकीमुळे यूपीए सरकारच्या प्रतिमेला तडा गेला आहे. याची भरपाई केली जाऊ शकत नाही, असे मत भाजपचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी व्यक्त केले.

अडवाणी यांनी रविवारी त्यांच्या ब्लॉगवर लिहिले की, अँटनींचा विरोधी पक्षाच्या खासदारांनी केलेला विरोध हा देशातील नागरिकांच्या राग दर्शवतो. या रागामुळेच अँटनींना त्यांचे विधान बदलावे लागले. तेलंगणा प्रकरणामुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात काहीच कामकाज होऊ शकले नाही.

काँग्रेसच्या काळातील संसदेइतके कमजोर कार्य मी माझ्या 41 वर्षांत कधीच पाहिले नाही. सरकार संसद चालवण्यात अयशस्वी ठरले आहे. तेलंगणा मुद्दय़ावर खासदारांना शांत ठेवण्याचे सरकारने कोणतेही प्रयत्न केले नसल्याचे त्यांनी सांगितले.