आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Is Arvind Kejriwal Banking On Congress Pulling Out?

ANALYSIS: अवघड ठरू शकते आंदोलन, जाणून घ्या केजरीवालांचा GAME PLAN

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- दिल्‍ली पोलिसांचा मुद्दा घेऊन अरविंद केजरीवालच्‍या 'आप' आणि केंद्र सरकारच्‍या 'कॉंग्रेस' सरकारमध्‍ये तणाव निर्माण होत आहे. केजरीवाल एकाच वेळी सरकारची आणि विरोधी पक्षाची भूमिका निभावताना दिसत आहेत. किंबहूना 'आम आदमी पक्ष' आणि 'कॉंग्रेस' यांच्‍यामधील दरी वाढण्‍यासाठीच केजरीवाल प्रयत्‍न करीत आहेत. जेणेकरुन जनतेत कॉंग्रेसविरोधी लाट निर्माण करुन लोकसभा निवडणुकीत लाभ उठविता येईल. परंतु, केजरीवाल यांच्‍या पक्षाला हे धरणे आंदोलन मारकही ठरू शकते.

आम आदमी पक्ष एक मोठ्या सुशिक्षित वर्गाची नाराजी ओढवत आहे. भलेही या वर्गाला पोलिसांची भूमिका पसंत नसली. तरीही हा वर्ग व्‍यवस्‍थेत परिवर्तन लावू इच्छित आहे. परंतु, आंदोलनाच्या पद्धतीमुळे केजरीवालांची ही राजकीय खेळी एका मोठ्या वर्गाला नाराज करत आहे.

सध्‍या केजरीवाल ज्‍या मागास भागातील लोकांसाठी आवाहन करत आहेत, बोलत आहेत त्‍यामुळे त्‍यांच्‍या मध्‍यमवर्गीय मतदारांमध्‍ये घट होऊ शकते. केजरीवालांना देशभरातील मागासवर्गातील मते मिळू शकत नाहीत. कारण आजही हा वर्ग मोठ्या प्रमाणावर जाती-पाती, उच्‍च-निच्‍चतेमध्‍ये गुंतलेला आहे. त्‍याऊलट देशभरातील शिक्षित मध्‍यमवर्ग केजरीवालांचा मतदार बनू श‍कतो.

पुढील स्‍लाइडवर वाचा, केजरीवालांचा प्‍लॅन/ स्‍टंट्स...