आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Is Arvind Kejriwal\'s Office Not Aware Of Its Own Expenditures On Advertisements?

दिल्ली CMOच्या हिशेबाचा तपशील \'आप\' सरकारकडे नाही, RTIमध्ये उघड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीतील आम आदमी पार्टी (आप) सरकारचे पहिला पूर्ण अर्थसंकल्प गुरुवारी सादर झाला. आपने त्याला स्वराज बजेट नाव दिले आहे. मात्र, आपच्या या सरकारकडे त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचा हिशेबच उपलब्ध नाही. माहिती अधिकारात (आरटीआय) मागवलेल्या एका माहितीत हा प्रकार उघड झाला आहे. आरटीआयमध्ये मुख्यमंत्री कार्यालय, जाहिरातींवर झालेल्या खर्चांची माहिती मागवण्यात आली होती, मात्र माहिती उपलब्ध नाही असे सांगण्यात आले आहे.
आरटीआय कार्यकर्ते जतिन गोयल यांनी 'सायबर सिपाही' नावाने सोशल मीडियावर एक ग्रुप फॉर्म केला आहे. जतीन यांनी आरटीआय अंतर्गत दिल्ली सरकारने भ्रष्टाचार हेल्पलाईल रि-लॉन्चिंगच्या कार्यक्रमाचा हिशेब मागितला होता. तसेच, सध्या टीव्ही चॅनल्सवर सुरु असलेल्या आप सरकारच्या जाहिरातीच्या खर्चाचाही हिशेब किती होता याची माहिती विचारण्यात आली होती.
सीएमओकडून उत्तर नाही
जतीन यांचा अर्ज प्रथम माहिती आणि जनसंपर्क संचालकांकडे पाठवण्यात आला होता त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवण्यात आला. मात्र मुख्यमंत्री कार्यालयाने माहिती देण्यास स्पष्ट नकार दिल्याचे आश्चर्य वाटत असल्याचे जतीन म्हणाले. राज्यातील सर्व फाइल मुख्यमंत्री कार्यालयातूनच पुढे सरकतात, असे असताना या कार्यालयाकडे माहिती नाही असे म्हणणे पटत नाही. जतीन गोयल म्हणाले, 'ज्या सरकारने दिल्लीतील जनतेला एवढी आश्वासने दिली ते त्यांच्या खर्चाचा हिशेब देखील देऊ शकत नाही हे निराशाजनक आहे.'

गोयल यांनी दाखल केलेल्या आरटीआयमध्ये हेल्पलाइन क्रमांकाच्या जाहिरातीवर (रेडिओ, टेलिव्हिजन आणि होर्डिंग्ज) होणार्‍या खर्चाची माहिती मागवली होती. या माहितीलाही सीएमओने नकार दिला आहे.
बातम्या आणखी आहेत...