नवी दिल्ली- जहाल दशतवादी संघटना ISIS ने एकदा पुन्हा भारताविरुद्ध गरळ ओकली आहे. ISIS भारतावर बांगलादेश व पाकिस्तानच्या बाजुने हल्ला करण्याचा कट रचला आहे. ISIS ने 'दाबिक' (Dabiq) मासिकाच्या माध्यमातून हा खुलासा केला आहे.
बांगलादेश व पाकिस्तानमधून भारतात घुसखोरी करून मोठा हल्ला करण्याचा ISIS चे षडयंत्र रचले आहे. यावेळी ISIS ने पहिल्यांदा हिंदुंना टार्गेट केले आहे.
ISISचा भारतावर 'गुरिल्ला अटॅक'चा कट...
- इस्लामिक स्टेट अर्थात ISIS ने आपले ऑनलाइन मॅगझिन 'दाबिक'मधून भारतावर 'गुरिल्ला अटॅक' करण्याचा खुलासा केला आहे.
- बांगलादेशमधील ISISचा म्होरक्या शेख अबू इब्राहिम अल-हनीफ याचा एक इंटरव्ह्यू 'दाबिक'मध्ये प्रकाशित झाला आहे.
- भारतावर बांगलादेश व पाकिस्तानातून हल्ला करण्याच्या वृत्ताला अबूने दुजोरा दिला आहे.
- भारतावर हल्ला करून बांगलादेशात ISISचा गड बनवण्याची दहशतवाद्यांचा कट आहे.
- भारतावर हल्ला करण्यासाठी ISISला इंडियन मुझाहिदीन सहकार्य करत असल्याची माहिती मिळाली आहे.
पहिलांदा हिंदुंना इशारा...
- 'दाबिक'मधून ISISचा कमांडर अबुने भारतातील हिंदुंना पहिलांदा खुले आव्हान दिले आहे.
- भारतात हिंदुंनी इस्लाम धर्माविरोधात युद्ध पुकारले आहे.
- भारताता हिंदु लोक मुस्लिम समुदायांला टार्गेट केले जात असल्याचे अबुने म्हटले आहे.
- ''बांगलादेशातही काही मुस्लिम लोक इस्लाम धर्माविरोधात काम करत आहे.
इंडियन इंटेलिजन्स ब्यूरोनुसार (IB), ISIS चे हे प्रोपेगंडा वॉर आहे. भारतातील मुस्लिम समुदायाचा आपल्या संघटनेला पाठिंबा मिळवण्यासाठी ISIS ने हा इशारा दिला आहे.