आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली आणखी एका निवडणुकीसाठी तयार आहे काय?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळेल, असे दिसत नाही. मात्र, प्रत्येक पक्ष आपल्या बाजूने निकाल लागेल, अशी आशा बाळगून आहे.गेल्या चार निवडणुकांमध्ये 14 जागांवर आपल्या पक्षाचे उमेदवार पराभूत झाले नसल्याचा दावा भाजपने केला आहे. कॉँग्रेसच्या अशा 18 जागा आहेत. याचाच अर्थ 70 पैकी केवळ 38 जागांवर स्पर्धा आहे. या पार्श्वभूमीवर वस्तुस्थिती जाणून घेण्याचा हा प्रयत्न.
निवडणुकीच्याआधी सर्व राजकीय पक्षांचे आपापले दावे आणि त्यांचे गणित
भाजप । काँग्रेसविरोधी लाटेचा फायदा होईल
कॉँग्रेसविरोधी लाटेमुळे आपल्या पक्षाला फायदा होईल, असे भाजपला वाटते. कॉँग्रेसविरोधी मत आम आदमी पार्टीकडे(आप) जात आहे. मात्र, केवळ नकारात्मक मताच्या आधारावर सरकार स्थापन होऊ शकत नाही. दिल्लीमध्ये भाजपचे संघटन असून झोकून देऊन काम करणारे कार्यकर्तेही आहेत. त्यामुळे राजधानीत भाजपचेच सरकार स्थापन होईल.
काँग्रेस । मत विभाजनामुळे फायदा मिळण्याचा विश्वास
कॉँग्रेसविरोधी मत ‘आप’ला मिळत आहे, असा कॉँग्रेसचा दावा आहे. त्यामुळे चिंतेचे कारण नाही. ही मते भाजपकडे वळली असती तर काळजी होती. मजबूत संघटनेसोबत कॉँग्रेसविरोधी मते मिळाल्यास भाजपचे सरकार स्थापन होऊ शकते. मत विभाजनामुळे कॉँग्रेसचे पुन्हा सरकार स्थापन होईल. आपला मिळणारी मते कॉँग्रेसची नव्हेत तर बसपाची आहेत.
आम आदमी पार्टी । सर्व वर्गांना आशा
झोपडपट्टीपासून मध्यम वर्ग, सरकारी कर्मचा-यांची पसंती आप आहे. दिल्लीत सोळा लाख नव मतदार आहेत. या मतदारांची आपलाच पसंती असल्यामुळे अन्य पक्ष कशी सत्ता स्थापन करेल, असा दावा त्यांचा आहे. मात्र, त्याचबरोबर आपचे बहुतांश उमेदवार पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत.
बसपा । 15 जागा मिळण्याची आशा
बसपाचे स्वत:चे एक गणित आहे. पक्षाला गेल्या निवडणुकीत 16 टक्के मते मिळाली होती व दोन जागा जिंकल्या होत्या. सात जागांवर ते दुस-या क्रमांकावर होते. दोन जागांवर त्यांचा 500 मतांपेक्षा कमी फरकाने पराभव झाला. तुघलकाबाद 400 ने आणि बदरपूर मतदारसंघ 250 मतांनी निसटला. तीन जागांवर बसपाचे प्रभारी मोहंमद सगीर यांनी या वेळी कमीत कमी 15 जागा मिळतील, अशी आशा व्यक्त केली.
अन्य । दिल्लीच्या पोटात प्रादेशिक दिल्ली
विविध पक्षांच्या दाव्याआधी दिल्लीचे वास्तव समजून घेणे आवश्यक ठरते. दिल्लीच्या पोटात ‘प्रादेशिक दिल्ली’ वसली आहे. उदाहणार्थ, जनकपुरी, राजौरी गार्डन हे शीख बहुल भाग आहेत. नागलोई, मुंडका, नजफगड आणि बिजवासन यासारख्या भागात जाटांचे वर्चस्व आहे. उत्तर प्रदेशला लागून काही मतदारसंघ आहेत. बिहार-पूर्वांचलमधून आलेले नागरिक किराडी, उत्तमनगर, मटियाला, तुघलकाबाद, आंबेडकरनगर, बदरपूर, बाबरपूर, ओखला या मतदारसंघात राहतात. यातील प्रत्येक मतदारसंघासाठी पक्षांना वेगवेगळी रणनीती आखावी लागते.
निकाल जनमत चाचणीनुसार(कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही) लागल्यास सर्वाधिक नुकसान आपचे होईल. याचे कारण म्हणजे आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल कोणत्याही पक्षाचा पाठिंबा घेणार नाहीत व देणारही नाहीत. अशा स्थितीत पुन्हा निवडणूक घेण्याचा पर्याय उपलब्ध आहे. दिल्ली त्यासाठी तयार आहे काय?