आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Is This So Amitabh Become President; Shatrughan Sinha

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

असे असेल तर अमिताभ राष्‍ट्रपती व्हायला हवेत - शत्रुघ्न सिन्हा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावरून भाजपमध्ये सुरू असलेल्या वादाला शत्रुघ्न सिन्हा यांनी गुरुवारी नव्याने फोडणी दिली. लोकप्रियता हाच निकष असेल तर महानायक अमिताभ बच्चन यांनी राष्‍ट्रपतीच व्हायला हवे, असा टोला त्यांनी मारला. पक्षातील सर्वांत ज्येष्ठ म्हणून तसेच सर्वार्थाने विचार करता लालकृष्ण अडवाणी हेच पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराची सूत्रे नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपवल्यानंतर भाजपमध्ये, विशेषत: अडवाणी समर्थकांत निर्माण झालेली अस्वस्थता दूर करण्यासाठी संघाला हस्तक्षेप करावा लागला होता. यात काहीअंशी यशही आले. मात्र, सिन्हा यांनी नव्याने वाद उकरून काढला. पक्षाध्यक्ष राजनाथसिंह यांनी मोदीच लोकप्रिय असल्याचे सांगून पंतप्रधानपदासाठी त्यांच्या दावेदारीला बळकटी दिली होती. पाटणासाहेब मतदारसंघातून सिन्हा खासदार आहेत.