आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ishrat Jaha Encounter: CBI Its First Chargesheet Submiting On 4 Julay

इशरत जहाँ चकमक : सीबीआय पहिले आरोपपत्र चार जुलैला दाखल करणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/अहमदाबाद - गुजरातमध्ये 2004 मध्ये इशरत जहाँ चकमकप्रकरणी सीबीआय पहिले आरोपपत्र 4 जुलैला दाखल करणार आहे. यात मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि गुप्तचर विभागाचे विशेष संचालक राजेंद्रकुमार यांची नावे आरोपी म्हणून घेण्यात आलेली नाहीत.


सीबीआयने यापूर्वी या चकमकीचा कट रचण्यात आला होता, असा दावा करून कुमार यांना हे माहीत होते. प्रत्येक घडामोडीची माहिती सरकारमधील काही ज्येष्ठ नेत्यांना दिली जात होती, असा दावा केला होता. तसे पुरावे गृहमंत्रालयाकडे सादर करण्यात आले होते. कुमार हेच या बनावट चकमकीचे सूत्रधार होते, असाही दावा करण्यात आला होता. 15 जून 2004 रोजी अहमदाबादलगत झालेल्या चकमकीत मुंब्रा येथील 19 वर्षीय विद्यार्थिनी इशरत जहाँ, जावेद शेख ऊर्फ प्रणेश पिल्लई, अमजद अली अकर अली राणा आणि जिशान जोहर हे चौघे ठार झाले होते. हे सर्व लष्कर-ए-तोयबाचे सदस्य होते. मोदी यांच्या हत्येच्या उद्देशाने हे लोक गुजरातमध्ये आले होते, असा सीबीआयचा दावा होता. दरम्यान, सीबीआय संचालक रणजित सिन्हा यांनी सांगितले, चकमकीत थेट सहभागी असलेल्या पोलिसांचीच नावे आरोपपत्रात आहेत. या चौघांच्या हत्येचा कट रचल्याच्या संदर्भाचा आरोपपत्रात उल्लेख आलेला नाही.