आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशरत जहाँ प्रकरण: दुसरे प्रतिज्ञापत्र योग्यच- माजी मंत्री वीरप्पा मोईली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - माजी केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईली यांनी इशरत जहाँ चकमक प्रकरणात दुसरे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचा यूपीए सरकारचा निर्णय योग्य ठरवला आहे. यासोबत तत्कालीन गृहसचिव जी. के. पिल्लई यांच्या या प्रकरणापासून स्वत:ला विभक्त करण्याच्या कृतीवर त्यांनी टीका केली आहे.

मोईली यांनी कायदामंत्री असताना दुसरे प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. ते म्हणाले, दुसरे प्रतिज्ञापत्र दाखल करणे गुन्हा नाही. पहिले प्रतिज्ञापत्र गुप्तचर संस्था (आयबी) आणि गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दाखल केले हेाते. दुसरे तपास अहवालानंतर दाखल केले. पिल्लई यांनी इशरत जहाँ चकमकीत तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी प्रतिज्ञापत्र बदलले हेाते, असा गौप्यस्फोट नुकताच केला. पहिल्या प्रतिज्ञापत्रात बनावट चकमकीत ठार झालेले चौघेही दहशतवादी होते, असे म्हटले होते. दोन महिन्यांच्या आत २००९ मध्ये दाखल दुसऱ्या प्रतिज्ञापत्रात म्हटले की, चौकशीत निर्णायक पुरावे मिळाले नाहीत. पिल्लई यांच्या गौप्यस्फोटामुळे काँग्रेसचे नेते भाजपच्या निशाण्यावर आले आहेत.
पुढे वाचा, पोलिसांविरुद्ध कारवाईची सुनावणी ११ रोजी..