आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ishrat Jahan Case P Chidambaram Denies He Signed Affidavits

चिदंबरम म्हणाले, इशरत प्रकरणी सही केली नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी इशरत जहाँ प्रकरणात बदललेल्या प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी केली. त्यावर गृहमंत्री स्वाक्षरी करत नसतात, अवर सचिव स्वाक्षरी करत असतात, असे म्हटले आहे.

चिदंबरम यांनी सोमवारी टि्वट केले की, अखेर बनावट चकमक का झाली हा मुख्य मुद्दा आहे. चार जण सुरुवातीपासून ताब्यात होते त्यांना यात मारण्यात आले काय? भाजप मुख्य मुद्द्यापासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे ते प्रतिज्ञापत्राला विनाकारण महत्त्व देत आहे. चिदंबरम यांच्या टि्वटवर केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी त्यांना फटकारले. ते म्हणाले की, हा प्रकार वादातून बचाव करण्यासाठी होत आहे. कोणत्याही मंत्र्याच्या सहमतीशिवाय कोणताही अवर सचिव प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करू शकत नाही.
इशरतला शहीद ठरवणारे कोण? इशरतचा मुद्दा सोमवारी लोकसभेतील शून्य प्रहरात उपस्थित झाला. भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी काँग्रेसवर निशाणा साधत म्हटले की, सहा वर्षांपूर्वी शहीद ठरवणारे लोक कोण आहेत, याचे वास्तव समोर आले पाहिजे.