आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ishrat Jahan Fake Encounter: Congress BJP War Of Words Over

गुप्तहेर संस्थांना आपापसामध्ये लढवत आहे मनमोहन सरकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - गुजरातच्या इशरत जहाँ प्रकरणात देशातील प्रमुख गुप्तहेर संस्थांना आपापसात लढवण्याचे काम पंतप्रधान मनमोहनसिंग यांचे सरकार करत असल्याचा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे करण्यात आला आहे.

ऑर्गनायझर या संघाच्या मुखपत्रात ‘संस्थांमधील चकमक’ या शीर्षकाखाली संपादकीय लेख प्रकाशित झाला आहे. सीबीआय, आयबी, एनआयए आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोग या संस्थांना मनमोहनसिंग सरकार एकमेकांशी लढवत असल्याचा आरोप या लेखाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. राजकीय स्वार्थांच्या पूर्ततेसाठी केंद्र सरकार या गुप्तहेर संघटनांचा आत्मविश्वास डळमळीत करण्याचे काम करत आहे. इशरत चकमक प्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या चार्जशीटनुसार गुजरात सरकार आणि मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना कोर्टात खेचण्याची तयारी सुरू आहे.