आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अफगाणातील भारतीय दूतावासाजवळ हल्ला, 12 ठार, मृतांत 8 मुले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काबूल/जलालाबाद- अफगाणिस्तानातील जलालाबाद शहरात भारताच्या वाणिज्य दूतावासाला लक्ष्य करत आत्मघाती हल्ला झाला. शनिवारी झालेल्या या घातपातात 12 जणांचा मृत्यू झाला. 124 जण जखमी आहेत. मृतांत तीन हल्लेखोरांसह 8 मुलांचा समावेश आहे. या घटनेत कोणाही भारतीयाला इजा झालेली नाही.

स्फोटकांनी खचाखच भरलेली कार घेऊन तीन हल्लेखोर सकाळी दहाच्या सुमारास निघाले. दूतावासाच्या अलीकडेच मशिदीजवळ एक हल्लेखोराने स्फोट घडवून आणला. त्यानंतर स्फोटकांचे जॅकेट घालून उरलेल्या दोघांनी दूतावासात घुसण्याचा प्रयत्न केला. पण सुरक्षा रक्षकांनी त्यांनी प्रवेशद्वाराजवळच ठार केले. हल्ल्याच्या वेळी भारतीय दूतावासात व्हिसासाठी अर्जदारांची मोठी रांग लागलेली होती. परिसरात सुमारे तासभर गोळीबार सुरू होता. जवळच पाकिस्तानचे वाणिज्य दूतावास आहे.

दूतावासातील सर्व जण सुखरूप
हल्ल्यात भारतीय दूतावासातील कोणा कर्मचाºयाला इजा झालेली नाही. सर्व कर्मचारी, अधिकारी सुखरूप आहेत, असे भारतीय परराष्टÑ खात्याचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांनी ट्विट केले आहे.

मशिदीतील मुलांचा मृत्यू
हल्ल्यात मशीद, दुकाने, इमारतींचे नुकसान झाले. मुलांचा बळी गेला आहे. ही मुले मशिदीत धार्मिक शिक्षण घेत होती, असे नानराहट प्रांताचे पोलिस प्रमुख जनरल शरीफ अमीन यांनी स्पष्ट केले.

भारत ‘टार्गेट’
० 2008 मध्ये काबूलमधील भारतीय दूतावासावर कार बॉम्बने हल्ला करण्यात आला होता. यात 60 हून अधिक लोक मारले गेले होते.
० 2010 मध्ये दोन विश्रामगृहांवरील हल्ल्यांत 16 जण मृत्युमुखी पडले. यात 7 भारतीय होते.

पाकिस्तानच्या हक्कानीवर संशय
हल्ल्यात हात असल्याबाबत तालिबानने इन्कार केला. पाकची गुप्तचर संस्था आयएसआयसमर्थित हक्कानी नेटवर्कचा हात असल्याची शंका आहे. भारतीय मालमत्तेवर हल्ल्याची शक्यता आधीच वर्तवली गेली होती.

ब्रिटन, जर्मनीचे बंद धोरण
लंडन- सुरक्षेच्या कारणावरून ब्रिटन आणि जर्मनीचे दूतावास 4 आणि 5 ऑगस्ट रोजी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रमजानच्या अखेरच्या दिवसांत आणि ईदच्या काळात सुरक्षेबाबत आम्हाला चिंता आहे, असे ब्रिटनच्या परराष्टÑ खात्याने म्हटले आहे. येमेनमध्ये शुक्रवार, शनिवारी वीकेण्ड असतो. रविवारी कार्यालये सुरू राहतात.

भीतीमुळे 21 अमेरिकी दूतावास बंद
वॉशिंग्टन- अल कायदाच्या भीतीने रविवारी जभभरातील अमेरिकेचे 21 दूतावास बंद राहणार आहेत. वास्तविक अमेरिकेने शुक्रवारीच ग्लोबल ट्रॅव्हल अलर्ट जारी केला होता. त्यानुसार अल कायदा ऑगस्टमध्ये अमेरिकी प्रतिष्ठानांवर हल्ले करण्याची शक्यता आहे. मध्य पूर्व आणि उत्तर अमेरिकेत जाणाºयांना सतर्क राहण्याचे सांगण्यात आले आहे. खबरदारी म्हणून 21 मुस्लिम राष्ट्रातील अमेरिकी दूतावास रविवारी बंद ठेवण्यात येणार आहेत. हे दूतावास नेहमी रविवारीही सुरू असतात.