आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ISI Lashkar Planning Attack In India Before Obama Visit

ओबामांच्या दौ-यापूर्वी भारतात हैदोस घाला, 150 दहशतवाद्यांना ISIचा आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी 26 जानेवारीला अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. पण त्याआधी पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI आणि लश्कर ए तोयबा ही दहशतवादी संघटना भारतात आत्मघातकी हल्ले घडवण्याच्या प्रयत्नात आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयएसआयने 150 हून अधिक दहशतवाद्यांना भारतात हैदोस घालण्याचा आदेश दिला आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयएसआय आणि लश्कर जम्मूच्या अरनिया सेक्टरमध्ये गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या हल्ल्याप्रमाणेच हल्ले करण्याचा कट रचत आहे. हे हल्ले घडवण्यासाठी लश्करचे 60 दहशतवादी पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये आले आहेत. चिनाब नदीमार्गेही शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याच्या बहाण्याने दहशतवाद्यांना भारतात घुसवण्याचा डाव असल्याचे इनपुट बीएसएफलाही मिळाले आहे. अरनियामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये अनेक तास चकमक झाली होती. त्यात तीन जवान, तीन सामान्य नागरिक आणि चार दहशतवादी मारले गेले होते.
जम्मू-काश्मीर निवडणुकीत गोंधळ घालता आला नाही
गेल्या काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकी दरम्या पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI आणि दहशतवादी संघटना लश्कर ए तोयबा यांना काहीही गोंधळ घालता आला नव्हता. राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदानही झाले होते. आयएसआयने लश्कर ए तोयबावर मतदारांना घाबरवण्याची जबाबदारी टाकली होती, अशी माहितीही मिळाली आहे. त्यामुळे आयएसआय लश्कवर नाराज असल्याने आता जानेवारी महिन्यात हल्ले करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

पुढे वाचा, पाकिस्तानच्या बाबतीत अमेरिकेची नरमाईची भूमिका