आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ISI May Use Khalistani Terrorists To Target Narendra Modi, IB Warns

मोदींची पंजाब रॅली अतिरेकी निशान्यावर; ‘आयबी’ने केले पोलिसांना सतर्क

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/चंदीगड- बिहारमध्ये नरेंद्र मोदींच्या पाटणा येथील रॅलीत झालेल्या सिरीयल ब्लास्टनंतर त्यांच्या जीवाला धोका वाढला आहे. मोदींवर हल्ल्याचा कट रचला जात असल्याची नवी गुप्त माहिती ‘आयबी’ने (इंटलिजन्स ब्युरो) दिली. यासंबंधी आयबीने पंजाब पोलिसांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. डिसेंबरमध्ये मोगा येथे मोदी रॅली काढणार आहेत.

आयबी या गुप्तचर यंत्रणेच्या सूत्रांनुसार, पंजाबमधील दहशतवादी हल्ल्यातील सहभागी काही दहशतवाद्यांनी पाकिस्तानी सीमेतून विस्फोटकांसह भारतात घुसखोरी केल्याचे वृत्त आहे. या विस्फोटकांचा वापर हे दहशतवादी मोदींच्या पंजाबमधील डिसेंबरमधील नियोजित या रॅलीत करण्याची शक्यता आहे. पाकिस्तानमध्ये सक्रिय भारतविरोधी गट खलिस्तानसमर्थक दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत आहेत किंवा प्रशिक्षण दिले आहे. मोदी यांच्या मोगा येथील रॅलीत हल्ला होण्याची शक्यता यासाठी आहे की, खलिस्तानी दहशतवाद्यांना पंजाबमध्ये आश्रय घेणे सहज शक्य होते. यावर नियंत्रण ठेवणे कठीण आहे.

हल्ल्यासाठी दहशतवादी संघटना एकत्र
गृह मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, मोदी यांना लक्ष्य करण्यासाठी अनेक अतिरेकी संघटना पुढे सरसावल्या आहेत. लष्कर-ए-तोयबा, हिजबुल मुजाहिदीन आणि शहिद बिलाल या दहशतवादी संघटना एकत्र आल्या असून, त्या मोदींवर केव्हाही हल्ला करू शकतात. आयएसआयच्या आदेशानुसार, इंडियन मुजाहिदीनवर अशा आॅपरेशनची जबाबदारी सोपवली आहे. खलिस्तानी समर्थक त्यांना सहकार्य करत आहेत. गृह मंत्रालयाने पाठवलेल्या या पत्रात असे सांगण्यात आले आहे की, मोदींना अतिरेकी संघटनांप्रमाणे दाऊद इब्राहिमचाही धोका आहे.

पाटणा रॅलीपासून घेतला धडा
बिहार पोलिसांच्या दाव्यानुसार, पाटणा येथील हल्ल्याबाबत गुप्तचर माहिती न मिळाल्याने स्फोट थांबवू शकले नाहीत आणि आता आयबीने मोगा रॅलीत स्फोट होण्याचे संकेत दिले. त्यानुसार त्यांनी आतापासूनच सावध पावले उचलली आहेत.

बब्बर खालसाच्या वधावावर संशय
इंटेलिजन्सचे मुख्य हरदीप सिंह ढिल्लो यांनी सांगितले की, मुस्लिम दहशतवादी संघटना आणि खालिस्तानी समर्थक यांचा ताळमेळ राहिला आहे. पाटणामध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात बब्बर खालसा इंटरनॅशनलचे प्रमुख वधावासिंह बब्बर याचाही सहभाग असण्याची शक्यता आहे. यासंदर्भात ब्युरोच्या अहवालात इनपूट जोडण्यात आले आहेत.

पुढील स्लाईड्‍सवर वाचा, 'मोदींचा प्रभाव आहे पण लहर नाही'