आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Isis Fighters Execute Prisoners With Buried Bombs

ISIS च्‍या क्रूरकृत्‍याचा आणखी एक VIDEO सार्वजनिक‍; दहा जणांना उडवले, पाहा...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्‍हीडिओ पाहण्‍यासाठी फोटोमध्‍ये क्लिक करा - Divya Marathi
व्‍हीडिओ पाहण्‍यासाठी फोटोमध्‍ये क्लिक करा

काबूल - इस्लामिक स्टेट (ISIS) या दहशतवादी संघटनेने आपल्‍या क्रूरकृत्‍याचा आणखी एक व्‍हीडिओ सार्वजनिक केला. तो अफगानिस्तानमधील नंगरहार परिसरातील सीमेवर चित्रित केला गेला असून, हा भाग इराक-सीरियापासून 1600 किलोमीटर अंतरावर आहे. या व्‍हीडिओमध्‍ये अपहरण केलेल्‍या 10 व्‍यक्‍तींना आयईडीने (इम्प्रोवाइज्ड अक्सप्लोजिव्‍ह डिव्‍हाइस) उडवले गेल्‍याचे दिसत आहे. या दहा जणांनी धार्मिक नियम तोडल्‍याचा आरोप होता. इसिसच्‍या काही समर्थकांनी सोशल मीडियावर दावा केला की, ज्‍यांची हत्‍या केली ते कधीकाळी तालीबानी संघटनेचे सदस्‍य होते. पण, या बाबत व्‍हीडियोमध्‍ये काहीही माहिती दिलेली नाही.
नेमके काय आहे व्‍हीडिओमध्‍ये ?
आयएसआयएसच्‍या इतर व्‍हीडिओप्रमाणेच याचेही चित्रिकरण आणि संपादन केलेले आहे. या हाय डेफिनेशन व्‍हीडियोमध्‍ये दहशतवादी हे घोड्यावरून येताना दिसत आहेत. ज्‍यांची हत्‍या करण्‍यात येणार आहे त्‍या प्रत्‍येकाचा चेहरा पहिल्‍या दृश्‍यात दाखवला गेला. त्‍यानंतर त्‍यांच्‍याकडून गुन्‍हा कबूल करून घेतला जात आहे. पुढच्‍या सीनमध्‍ये काही दहशतवादी हे डोंगराआडून घोड्यावर येतात आणि या 10 जणांना गुडघ्‍यावर बसवतात. त्‍यांच्‍या मागे बंदूक घेऊन दहशतवादी उभे आहेत. एकाच्‍या हाती इसिसचा झेंडाही दिसत आहे.
खड्डे करून बॉम्‍ब लावले; नंतर उडवले
दशहतवाद्यांनी अगोदर खोदलेल्‍या खड्ड्यामध्‍ये बॉम्‍ब ठेवतात. त्‍यानंतर त्‍या बॉम्‍बवर त्‍या 10 जणांना बसवले जाते. नंतर ते त्‍याचा स्‍फोट घडवून आणला जातो. पुढे त्‍यांच्‍या शरिराचे तुकडे पडलेले दिसतात.

पुढील स्लाइड्सवर पाहा, आयएसआयएसच्‍या या व्‍हीडियोवरून घेतलेले फोटोज.