आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISIS चे लक्ष्य आता ब्रिटन, नाताळाच्‍या उत्‍सवावर आत्मघाती हल्ल्यांचा इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - सिरियामध्ये पाश्चिमात्य देशांनी आयएसआयएसविरुद्ध(इसिस) उघडलेल्या आघाडीमुळे बिथरलेली आयएस संघटना फ्रान्सनंतर आता ब्रिटनला लक्ष्य करू इच्छित आहे. आयएसने जारी केलेल्या ध्वनिचित्रफितीत त्यांनी ब्रिटनमध्ये आत्मघाती हल्ल्याचा इशारा दिला आहे. ब्रिटिश खासदारांनी गेल्या आठवड्यात सिरियावरील हवाई हल्ले वाढवण्याच्या प्रस्तावावर मतदान केले. या पार्श्वभूमीवर हा इशारा देण्यात आला आहे.

सूड घेण्यासाठी युद्ध सुरू झाले असून आता रक्ताचे पाट वाहतील. फ्रान्सपासून त्याची सुरुवात झाली असल्याचे ध्वनिचित्रफितीमध्ये म्हटले आहे. खासदारांनी हवाई हल्ल्याच्या मुदतवाढीचा प्रस्ताव मंजूर केल्याच्या दिवशी म्हणजे बुधवारी ध्वनिचित्रफीत जारी केली. यामध्ये एके ४७ रायफल घेतलेला अतिरेक्याने स्फोटकांचा बेल्ट बांधलेला होता.

पॅरिसमध्ये १३० निरपराध लोकांचे बळी घेणाऱ्यांची तो स्तुती करताना दिसल्याचे संडे टाइम्सच्या हवाल्याने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे. इंग्रजी भाषेतील या संदेशात इराक आणि सिरियातील आयसविरोधी आघाडी सदस्यांना इशारा देताना, या जगात आमच्या बंदुकीपासून जगातील कोणताही देश आणि आयविरोधी शक्ती सुरक्षित राहू शकत नसल्याचा इशारा दिला आहे.

पॅरिस हल्ल्यातील म्होरक्याशी धागेदोरे पडताळणार
दरम्यान, पॅरिस हल्ल्यातील हल्लेखोरांचा म्होरक्या अबदीलअहमद अबाऊद आणि बर्मिंगहॅममधील संशयितांशी काही धागेदोरे जुळतात काय, याची शक्यता पडताळली जात असल्याचे दहशतवादविरोधी पोलिस दलाने म्हटले आहे. पॅरिसवरील हल्ल्यापूर्वी १३ नोव्हेंबरआधी बेल्जियम-मोरोक्कन वंशाच्या अबाऊदच्या संपर्कात अनेक लोक असल्याचे वृत्त होते. यानंतर पोलिसांकडून ही प्रतिक्रिया आली. एका बंदूकधाऱ्याने या वर्षी ब्रिटनला दिलेल्या भेटीत बर्मिंगहॅम आणि लंडनला गेल्याची कबुली दिली होती. त्याने हल्ल्याआधी बर्मिंगहॅममध्ये दूरध्वनी केले होते.
पुढील स्‍लाइडवर वाचा, ४०० अतिरेकी दाखल झाल्याची भीती