आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • ISIS Massacre In Northern Iraq Killed Shiite Villagers, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतातील शिया मुस्लिम इराकमध्‍ये जाण्‍यास उत्सूक, उच्चशिक्षितांचीही जाण्याची तयारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(इराकमधील किरकुकमध्‍ये झालेल्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांना पुरवताना) - Divya Marathi
(इराकमधील किरकुकमध्‍ये झालेल्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांना पुरवताना)
नवी दिल्ली - एका लाखापेक्षा जास्त मुस्लिम युवकांनी इराकमध्‍ये जाण्‍यासाठी रजिस्‍ट्रेशन केल्याचा दावा दिल्लीतील एका शिया संस्थेने केला आहे. ती सर्व इराकमधील शिया धर्मस्थळांना संरक्षण देण्‍यासाठी जाणार आहेत. रजिस्ट्रेशन करणा-यांमध्‍ये बिल्डर्स, व्यापारी, उच्च पदस्थ अधिकारी, बँक आणि टेलिकॉम कंपन्यांमधील अधिका-यांचा समावेश आहे. दक्षिण दिल्लीतील अंजुमन-ए-हैदरी संस्थेने रजिस्‍ट्रेशन अर्ज वाटली. आतापर्यंत एका लाखापेक्षा जास्त इच्छुकांनी इराकमध्‍ये असलेल्या धर्मस्थळांना संरक्षण देण्‍यासाठी रसिस्ट्रेशन केले आहे. असताना, या त्यांना व्हिसा मिळेल याची शक्यता कमी आहे. पासपोर्ट असलेल्यांनाच अंजुमनने रजिस्ट्रेशन करण्‍यास परवानगी दिली आहे. इराकमध्‍ये जाणे आमच्यासाठी गरजेच आहे. तेथील शियांवर अत्याचार होत आहेत. या कृत्यास कोणतेही नाव देता येणार नाही. मला आयएसआयएस काय आहे हे माहीत नाही. पण मी तेथे जाणार आहे कारण ते माझे धार्मिक कर्तव्य आहे, असे रजिस्‍ट्रेशन केलेल्या व्यक्तीने सांगितले.

इराकमध्‍ये सुरू झालेल्या हिंसेच्या पार्श्‍वभूमीवर आम्ही रजिस्ट्रेशन सुरू केले होते. जवळ-जवळ एक लाख लोकांनी रजिस्ट्रेशन केले आहे. पण आमचे लक्ष्‍य आहे 10 लोकांचे. देशातील 5-6 कोटी शिया लोकसंख्‍येत आम्हाला हवी ती संख्‍यातरी मिळेल. मौलाना कल्बे जावाद यांच्या नेतृत्वाखाली आम्ही इराकला जाणार आहोत. ते सध्‍या दौ-यावर आहेत. जसे ते परतील, आम्ही इराकी दुतावासाकडे व्हिसेसाठी अर्ज करणार आहोत. प्रत्येक व्यक्ती आपला स्वत:चा खर्च उचलेल. आम्ही आमची धार्मिक स्थळे उध्‍दवस्त होताना पाहु शकत नाही,असे अंजुमन-ए-हैदरीचे प्रमुख अली मिर्झा यांनी सांगितले.

हजारोंने हत्या
त‍िकडे, उत्तर इराकमधील शिया रहिवाशांची हत्या करण्‍यात आली आहे, असे स्थानिक लोकांनी सांगितले. हे कृत्य ब्रावची, करनाझ, चारदाघली आणि बेशिर या गावांमध्‍ये आयएसआयएस या दहशतवादी संघटनेने घडवून आणला आहे, असे वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टमध्‍ये दाखवण्‍यात आले आहे. किरकुकचे डेप्युटी पोलिस चीफ जनरल तुर्हान अब्देल रहमान यांच्या माहितीनुसार त्या चार गावांमध्‍ये कमीत-कमी 40 नागरिकांची हत्या करण्‍यात आल्याची आहे. ही संख्‍या वाढूही शकते. दहशतवाद्यांच्या हल्ल्यापासून बचाव करण्‍यासाठी लोक किरकुक भागात पळून गेले आहे. येथील सुरक्षेची जबाबदारी कुर्दीश सुरक्षा दलाकडे आहे.आपला जीव वाचवण्‍यासाठी पळत असलेल्या लोकांवर स्नायपर्सने गोळीबार करून हत्या केली, असे असोसिएटेड प्रेस रिपोर्टमध्‍ये स्पष्‍ट झाले आहे.दहशतवादी हॅम्वे गाड्या आणि ट्रकमधून गावात पोहोचले. त्या गाड्यांवर मशीनगन्स व आयएसआयएसची झेंडे लावण्‍यात आली होती, असे या हल्ल्यातून वाचलेल्या व्यक्तीने सांगितले.

17 दिवसांमध्‍ये 1 हजारांपेक्षा जास्त लोकांची हत्या
मागील 17 दिवसांमध्‍ये इराकमध्‍ये सुरू असलेल्या ह‍िंसेमध्‍ये 1 हजार लोकांची हत्या करण्‍यात आली आहे, असे संयुक्त राष्‍ट्रसंघाने मंगळवारी सांगितले.

पुढे पाहा... इराकमध्‍ये चालू असलेल्या घटनांची ताजी छायाचित्रे.....