आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • ISIS Militants Not Human Beings, Indian Worker From Iraq Told Reality

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इराकमध्ये अडकलेल्या भारतीयाने सांगितले, ISIS मौज-मस्तीसाठी गोळ्या घालतात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - इराकमध्ये अपहरण झालेल्या 40 भारतीयांसोबत अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. राक सरकारने अपहृत भारतीयांबद्दल माहिती दिल्याचे परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांनी सांगितले, परंतु सरकारने नेमके ठिकाण सांगितले नाही. अपहृतांच्या कुटुबीयांनी गुरुवारी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली. कुटुंबीयांसोबत पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादलही होते. सुटकेसाठी प्रयत्न सुरू असून सर्व घडामोडींवर जातीने निगराणी करत असल्याचे स्वराज यांनी सांगितले. मात्र, इराकमधील परिस्थिती अजून लवकर सुधाण्याची शक्यता कमीच आहे. मोसुल शहरातून स्वतःचा जीव वाचवण्यात यशस्वी झालेले भारतीय मजूर अहमद यांनी सांगितल्यानुसार, 'आयएसआयएसचे दहशतवादी हैवान झाले आहेत. त्यांच्या मनात येईल त्याला ते मारत आहेत. लोकांचा जीव घेण्यात त्यांना आनंद वाटत आहे. आता इराकचा कोणताही भाग सुरक्षीत राहिलेला नाही. तिथे मरण फार स्वस्त झाले आहे.' (अहमद यांनी सांगितलेले वास्तव वाचा, पुढील स्लाइडमध्ये)
इराक संकटाची ताजी माहिती
सोनिया गांधींनी लिहिले पत्र
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी इराकमध्ये अपहरण झालेल्या आणि तिथे अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षीत भारतात परत आणण्याची मागणी केली आहे. इराकमध्ये जवळपास 10 हजारांहून अधिक भारतीय आहेत.
अमेरिका सैन्य सल्लागार पाठवणार
दहशतवाद्यांचा हल्ला झेलणा-या इराकच्या सैन्याला मदत करण्यासाठी अमेरिका सैन्य सल्लागार पाठवणार आहे. तसेच गरज पडली तर मर्यादित कारवाई देखील करणार असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले आहे.


( छायाचित्र - किक्रक येथे दहशतवादी संघटनेच्या तावडीतून सुटलेले विदेशी कर्मचारी )