आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ISIS Offering Job To Indian Hackers For Intelligence Detail

गोपनिय माहिती चोरण्यासाठी ISISची इंडियन हॅकर्सला लाखोंची ऑफर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सरकारी गोपनिय माहिती चोरण्यासाठी जहाल दहशतवादी संघटना ISIS प्रयत्नात आहे. ISIS ने आतापर्यंत 30 हजार इंडियन हॅकर्सशी संपर्क साधल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गोपनिय माहितीच्या मोबदल्यात ISISने या हॅकर्सला 10 हजार अमेरिकन डॉलर्स (जवळपास 6 लाख 78 हजार रुपये) ऑफर दिली आहे.

दुसरीकडे, इंटरनेटद्वारे युवकांची भरती करणार्‍या या ISIS चे नेटवर्क उद्‍ध्वस्त करण्यासाठी गुप्तचर व सुरक्षा संस्थांनी तयारी केली आहे. इंटरनेटचाच वापर करून सुरक्षा संस्थांनी धाडसत्र चालवले आहे.

ISIS कशी करत आहे हॅकर्सशी संपर्क...
- सायबर क्राइम एक्सपर्ट किसलय चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ISIS मागील सहा महिन्यांपासून ऑनलाइन कम्युनिटीज हॅकर्सच्या संपर्कात आहे.
- सरकारी गोपनिय माहिती चोरण्‍यासाठी हॅकर्सचा आकर्षक ऑफर दिली जात आहे. ISIS ने यापूर्वी कोणत्या गोष्टीसाठी इतक्या किमतीची ऑफर दिली नव्हती.
- भारतीय गोपनिय माहिती मिळवून ISISचा स्वत:ला सामर्थ्यशाली करण्याचा उद्देश आहे.
- ISIS चे सपोर्टर्स 'फेसबुक' व 'ट्विटर'च्या माध्यमातून यंग जनरनेशनला टार्गेट करत आहेत. त्याची आयडियोलॉजी शेअर करण्यास सांगत आहेत.

ISISचा भारताला धोका?
- सुरक्षा संस्थांच्या सूत्रानुसार, ISIS आपली आयडियोलॉजी इंडियन हँडलरद्वारा सोशल मीडियात पसरवत आहेत.
- इंटरनेटवर प्रोपेगंडा हिंदी, तमिळ, गुजराती, उर्दू, बांगलासह अनेक प्रादेशिक भाषांमध्ये प्रकाशित करत आहेत.
- गेल्या दोन दिवसांत सुरक्षा संस्थाना देशात धाडसत्र चालवून ISIS शी संबंध असल्याच्या आरोपात 12 संशयित दहशतवाद्यांना अटक केले आहे.
- ISIS चे सपोर्टर्स युवकांची भरती करताना त्यांना कॉटेंट व व्हिडिओ देत आहे.
- ISIS ने भारतातील कम्युनल एक्टिव्हिटीवरही लक्ष पुरवले आहे. युवकांना देशाविरुद्ध चिथवण्याचे काम केले जाते.

का घेण्यात आली काउंटर अॅक्शन?
- महाराष्ट्र एटीएसने दावा केला आहे, की ISIS शी संबंधित 94 वेबसाइट्‍स ब्लॉक करण्‍यात आल्या आहेत.
- सोशल मीडियावर अनवॉन्टेड एक्टिव्हिटीजवर देखील 24X7 नजर ठेवण्यात आली आहे. यासाठी वॉर रूम बनवण्यात आले आहे.