आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ISIS Plan To Attack Modi On Republec Day Uses 12 15 Yrs Old Children

सुसाइड बॉम्बरच्या निशाण्यावर मोदी, ISIS देत आहे 12 ते 15 वर्षांच्या मुलांना ट्रेनिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी भाषण संपल्यानंतर मुलांची अशी भेट घेतली होती. - Divya Marathi
स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांनी भाषण संपल्यानंतर मुलांची अशी भेट घेतली होती.
नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनी आयएसआयएस पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करण्याची शक्यता आहे. इंटीलिजन्सच्या रिपोर्टनुसार, त्यासाठी आयएस 12 ते 15 वर्षांच्या वयाच्या मुलांना बॉम्बरम्हणून तयार करत आहे.

2-3 मुले असू शकतात सुसाइड बॉम्बर स्कॉडमध्ये
- अशी माहिती आहे, की इंटीलिजन्स रिपोर्टनंतर शुक्रवारपासून एसपीजी सह सर्व सुरक्षा यंत्रणा (एनएसजी, आयबी, दिल्ली पोलिस) अलर्टवर आहे.
- रिपोर्टनुसार, आयएस मोदींवर दहशतवादी हल्ला करण्याची शक्यता आहे.
- आयएसच्या या सुसाइड स्कॉडमध्ये 2-3 मुले असण्याची शक्यता आहे.
- त्यासाठी ते 12 ते 15 वर्षांच्या मुलांना शस्त्र आणि स्फोटके हताळण्याचे ट्रेनिंग देत आहेत.
- पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी एसपीजीकडे असते.

सुरक्षेबद्दल एसपीजी करत आहे तयारी
- 2015 मध्ये लालकिल्ल्यावर सुरक्षा कडे तोडत मोदी मुलांना भेटले होते.
- यंदा एनएसए अजित डोभाल आणि एसपीजीने पंतप्रधानांना अवाहन केले आहे, की सुरक्षा कडे तोडू नये.
- दिल्ली पोलिसांनाही संशयितांवर करडी नजर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- स्पेशल सेल देखिल सर्च ऑपरेशन करत राहाणार आहे.

सुरक्षा यंत्रणांना कुठून मिळाली 'खबर'
- आयएसने नुकताच एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. त्यात लहान मुलांना मशिनगन आणि रॉकेट लॉन्चर चालवण्याचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे दाखवण्यात आले.
- पाकव्याप्त काश्मिर (पीओके) आणि पाकिस्ता- अफगाणिस्तान रिजन (अफ-पाक) येथील दहशतवादी मुलांना अशाच प्रकारचे प्रशिक्षण देत आहेत.
- यापैकीच एक दहशतवादी गट अंसार-उद-तौहीद (एयूटी) आहे. हा गट भारतात आयएसचे नेटवर्क वाढवण्यात मदत करत आहे.