आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISIS चा संशयित दहशतवादी मुदब्बीर केवळ 5 वेळा नमाजसाठी पडायचा बाहेर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुदब्बीर शेखचा फ्लॅट. - Divya Marathi
मुदब्बीर शेखचा फ्लॅट.
मुंबई - गुरुवारी अटक करण्यात आलेला ISIS चा संशयित दहशतवादी मुदब्बीर मुश्ताक शेखबाबत नुकताच एक खुलासा झाला आहे. तो दिवसभरात केवळ पाच वेळा नमाजसाठी बाहेर पडायचा. इतर वेळ तो केवळ त्याचा लॅपटॉप आणि तीन मोबाईल फोनवर व्यस्त असायचा. मुदब्बीर ISIS च्या 14 मेंबरच्या सेलचा इन्चार्ज होता अशी माहितीही समोर येत आहे. तो स्वतःची ओळख ISIS चा म्होरक्या अबू बक्र बगदादीचा डेप्युटी म्हणून करून द्यायचा.

मुदब्बीर शेख आणि त्याबाबत समोर आलेली माहिती..
- मुंब्रा हाऊसमधून मुदब्बीरला अटक करण्यात आली होती. हाच त्याचा ठिकाणा होता असे म्हटले जाते.
- पोलिसांच्या मते तो हैदराबाद आणि अहमदाबादच्या तरुणांना त्याच्या आयडिया शेअर करायचा.
- 33 वर्षांच्या मुदब्बीर शेखकडे सॉफ्टवेअर डीप्लोमा आहे.
- 4 वर्षांपूर्वी त्याची नोकरी सुटली होती. बेरोजगार असताना त्याचा ISIS शी संबंध आला होता.
- 6 वर्षांपूर्वी त्याचा उजमा नावाच्या मुलीशी विवाह झाला होता. त्याला दोन मुली आहेत, त्यापैकी एकीचा नुकताच जन्म झालेला आहे.
- उजमाने मुदब्बीरला अटक झाल्यानंतर तो निर्दोष असल्याचे म्हटले होते. तो कोणत्याही देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी नसल्याचेही ती म्हणाली होती.
- मुदब्बीरच्या सासऱ्यांनीही त्याच्याबाबत चांगले मत व्यक्त केले. तो एक चांगला पती आणि पिता आहे. रोज मुलीला शाळेतून आणतो आणि पाच वेळा नमज पठन करतो असे ते म्हणाले.
- त्याचे नातेवाईक आणि मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार तो गेल्या काही महिन्यांपासून लोकांशी फार बोलत नव्हता. लॅपटॉपवरच तो अधिक अॅक्टीव्ह राहायचा असे त्यांनी सांगितले.

पहाटे तीन वाजता पोलिस धडकले घरी
- शुक्रवारी पहाटे ३ वाजता एटीस आणि NIA चे 15 अधिकारी मुतब्बीरच्या मुंब्रा येथील अपार्टमेंटमध्ये आले.
- त्यावेळी घरी फक्त त्याच्याशिवाय केवळ त्याची पत्नी होती.
- उजमाने सांगितले की, रात्रीच्या वेळी एवढे लोक घरी का आले हे मला कळत नव्हते. ते माझ्या पतीला किचनमध्ये घेऊन गेले. अधिकाऱ्यांनी आम्हाला हॉलमध्ये थांबायला सांगितले. नंतर ते मुदब्बीरच्या लॅपटॉप आणि मोबाईलची तपासणी करू लागले.