आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Isis Suspect Rizwan Was In Direct Touch Of Baghdadi

थेट बगदादीच्या संपर्कात होता रिजवान, घरचे म्हणाले- त्याला गोळ्या घाला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयएसचा हस्तक असल्याच्या संशयावरुन ताब्यात घेण्यात आलेला रिजवान - Divya Marathi
आयएसचा हस्तक असल्याच्या संशयावरुन ताब्यात घेण्यात आलेला रिजवान
गोरखपूर - कुशीनगर येथून अटक करण्यात आलेला आयएसआयएसचा संशयित हस्तक रिजवानच्या अटकेनंतर मोठा खुलासा झाला आहे. अशी माहिती आहे, की रिजवान आयएसआयएसचा म्होरक्या अबू बकर अल-बगदादीच्या थेट संपर्कात होता. दुसरीकडे लखनऊमध्ये अटक करण्यात आलेला अलीम अहमद राज्य सरकारकडून मिळालेल्या लॅपटॉपवर दहशतवादी संघटनांच्या वेबसाइट सर्च करत होता.

रिजवान चालवत होता ISIS चे विभागीय कार्यालय
- दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) रिजवानची कसून चौकशी केली.
- ऑपरेशनशी संबंधित सूत्रांनी सांगितले, 20 वर्षांच्या रिजवानला जन्नतमध्ये जाण्याची इच्छा होती, त्यासाठी त्याला सिरियात जावून त्यांच्यावतीने अमेरिकेच्या सैन्याशी लढायचे होते.
- तो गोव्यात 30 हजार रुपयांचे घर किरायाने घेऊन राहात होता.
- तेथून तो आयएसआयएसचे विभागीय कार्यालय चालवत होता.
फेसबुकच्या माध्यमातून आला होता आयएसच्या संपर्कात
- रिजवान आठ महिन्यांपासून फेसबुकच्या माध्यमातून आयएसआयएसच्या संपर्कात होता.
- त्याची सक्रियता पाहून त्याला चेन्नईला बोलावण्यात आले होते. तिथे त्याला एक लाख रुपये देऊन नवी जबाबदारी देण्यात आली.
- त्यानंतर आणखी पैसे देण्याचे आमिष दाखवण्यात आले.

स्लिपर सेल तयार करत होता
- सूत्रांच्या माहितीनुसार, रिजवना विविध ठिकाणी फिरून स्लिपर सेल तयार करत होता.
- अशी माहिती आहे, की त्यासाठी तो थेट बगदादीसोबत संपर्क ठेवत होता.
- पैशांसोबतच त्याला कामगिरी यशस्वी करुन दाखवली तर मोठा फायदा होईल असे सांगण्यात आले होते.
- सूत्रांचे म्हणणे आहे, की रिजवान एक मोठे षडयंत्र पूर्ण करण्याच्या तयारीत होता.
- देशातली अनेक ठिकाणी इंडियन मुजाहिदनच्या मदतीने स्फोट घडवण्याची त्याची योजना होती.
- कुशीनगरमध्येही (उत्तरप्रदेश) साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची तो योजना आखत होता.

अलीम अहमदने सरकारकडून मिळालेला लॅपटॉप विकला
- अलीमला राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि एसटीएफ टीमने ताब्यात घेतले होते. यावेळी हैदराबाद गुन्हे शाखेची टीमही लखनऊला उपस्थित होती.
- तो हैदराबादच्या चार संशयितांच्या संपर्कात होता.
- अलीमच्या बँक खात्यांचीही माहिती मिळाली आहे. त्याच्या खात्यात 1500 रुपये जमा असल्याचे कळाले आहे.
- तपास संस्थांचा दावा आहे, की आलीम सायबर कॅफेचे वापर करत नव्हता तो, सर्व काम लॅपटॉपवर करत होता.
- अलीमला सुगावा लागला होता, की पोलिस त्याचा शोध घेत आहेत. त्यामुळे तो लखनऊला बहिणीच्या घरी राहात होता.
- अलीमच्या कुटुंबियांनी सांगितले, की 12 वी नंतर सकारकडून त्याला लॅपटॉप मिळाला होता. काही दिवस वापर केल्यानंतर त्याने त्याची विक्री केली होती.
- अद्याप त्याचा लॅपटॉप जप्त करण्यात आलेला नाही.
ट्रांझिट रिमांडवर रिजवान
- रिजवानला मुंबई आणि वाराणसीच्या एटीएसने शनिवारी विशेष न्यायालयात हजर केले.
- न्यायाधीश आशिषकुमार चौरसिया यांनी त्याला ट्रांझिट रिमांडवर एटीएसच्या ताब्यात दिले.
- रिजवानला कुशीनगरच्या कसया भागातून आणखी एका युवकासोबत अटक करण्यात आली.
- त्यांच्या जवळून 60 मोबाइल सेट आणि पाच लाख रुपये कॅश जप्त करण्यात आले.
- दोघांकडे एटीएसने कसयाच्या एका हॉटेलमध्ये चौकशी केली.
- ट्रांझिट रिमांड मिळाल्यानंतर एटीएस पुढील चौकशीसाठी त्यांना घेऊन गेली.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, कुटुंबिय म्हणतात - त्याला गोळ्या घाला