आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Islamic State Invest Its Money In Share Market, Sebi Warn

इस्लामिक स्टेट आपला पैसा शेअर बाजारात गुंतवण्याची शक्यता, सेबीचा इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - इस्लामिक स्टेट आपला पैसा शेअर बाजारात गुंतवण्याची शक्यता आहे, असा इशारा सेबीने दिला आहे. सेबीने शेअर बाजारांना दहशतवादी गटांची नवी यादी पाठवली असून तीत ‘इसिस’चेही (इस्लामिक स्टेट) नाव आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने या दहशतवादी गटावर निर्बंध घातले आहेत. शेअर बाजारांनीही आपल्या सदस्यांना तसेच संबंधित संस्थांना या यादीची माहिती दिली आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज आिण बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजनेही सर्व सदस्यांना प्रतिबंधाची ताजी यादी दिली आहे. त्याचबरोबर संशयित गुंतवणूकदारांबाबतही इशारा दिला आहे. सध्या भारतीय बाजारात इसिसच्या (इस्लामिक स्टेट) संशयित हालचाली उघडकीस आलेल्या नाहीत; परंतु नवी खाती उघडण्याआधी प्रतिबंधित यादी डोळ्यांसमोर ठेवावी, असे सेबीने सांगितले आहे. सध्याच्या ग्राहकांमधील काही जणांचा प्रतिबंधित यादीतील संघटनांशी संबंध असू शकतो, असा इशाराही सेबीने दिला आहे. या प्रतिबंधित यादीत यापूर्वीच अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, हाफिज सईद, हरकत-उल-जिहादी इस्लाम, ग्लोबल रिलीफ फाउंडेशनचा समावेश झाला आहे.