आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवाद्यांचा "टार्गेट ग्रुप'साठी नवा फंडा, एकात एक लिंक टाकून दिली जाते माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - इराक,सिरियासह अनेक इस्लामिक देशांत जम बसवलेली इस्लामिक स्टेट ऑफ इराक, सिरिया (आयएस) ही दहशतवादी संघटना भारतात इंटरनेटच्या माध्यमातून हालचाली नेटवर्क वाढवण्याच्या प्रयत्नात असल्याची सूत्रांची माहिती आहे. हे नेटवर्क मजबूत होण्याआधीच उद््ध्वस्त करण्याच्या दिशेने सरकारने उपाययोजना सुरू केल्या आहेत. सरकाराने न्यायालयीन निर्णयाद्वारे आयएससी संबंधित दहशतवादी सामग्री पुरवणाऱ्या सुमारे ३२ वेबसाइट्स ब्लॉक केल्या आहेत. परंतु आयएस ही संघटना एका खास उद्देशातून बेवासाइटवर आपला संदेश ठरावीक गटापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे हे पेज किंवा साइट्स ब्लॉक केल्याने ही समस्या सुटणार नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे दूरसंचार मंत्रालयाने आता सर्ट-इन (कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम इंडिया) अंतर्गत अशा साइट्सवर विशेष निगराणी ठेवण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या वेबसाइट ब्लॉक करण्यात आल्या त्यांची समीक्षा केली असता असे आढळून आले की या साइट, पेजवर थेट स्वरूपात कोणताच संदेश अथवा माहिती दहशतवादाशी संबंधित नव्हती. एका पेजवरून दुसऱ्या, दुसऱ्यातून तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या, सहाव्या पेजपर्यंत गेल्यानंतर संदेश उपलब्ध होत आहेत. इतकेच नव्हे तर जर एखाद्या पेजवर एका निश्चित संख्येपेक्षा जास्त वेळा क्लिक किंवा हिट झाले तर ते पेज आपोआप डिलिट अथवा करप्ट होते. त्यामुळे जोवर एखाद्या एजन्सीला गुप्तचर यंत्रणेला त्याची माहिती होईपर्यंत ते पेज डिलिट झालेले असते.